रस्त्याच्या कडेला उपरणे अंथरून दानवे बसले जेवायला

खाद्यांवरचे उपरणे अंथरले आणि गाडीतील डबा काढून तिथेच जेवायला सुरूवात केली. अवघ्या काही मिनिटात जेवण उरकत ते बदनापूरच्या सभेला रवानाही झाले.( Raosaheb Danve)
रस्त्याच्या कडेला उपरणे अंथरून दानवे बसले जेवायला

Minister Raosaheb Danve

Sarkarnama

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा साधेपणाचा प्रत्यय नेहमीच येत असतो. (Bjp)बरं या साधेपणाचा दानवे यांना सार्थ अभिमान देखील आहे. आपल्या विविध भाषण, सभा आणि कार्यक्रमांमधून देखील ते सातत्याने हे सांगत असतात. (Marathwada) तुम्ही कितीही मला बदलायचा प्रयत्न केला तरी मी माझा ग्रामीण बाज आणि ढंग सोडणार नाही, असेही ते स्पष्ट सांगतात. त्यांच्या साधेपणाचा आणखी एक प्रसंग नुकताच समोर आला.

जालना लोकसभा मतदारसंघातील सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत दानवे काल होते. ती सभा आटोपून त्यांना बदनापूरला सभा घ्यायची होती. पण दुपारचे जेवण राहिले होते, मग सोयगांवहून परततांना रस्त्यातच त्यांनी गाडी थांबवली. कडेला गाडी उभी केली, खाली उतरले आणि स्वच्छ जागा पाहून त्यांनी खाद्यांवरचे उपरणे अंथरले आणि गाडीतील डबा काढून तिथेच जेवायला सुरूवात केली.

अवघ्या काही मिनिटात जेवण उरकत ते बदनापूरच्या सभेला रवानाही झाले. राजकारणात मोठ्या पदावर गेले की लोक बदलतात, त्यांची राहणी, बोली आणि वागणे देखील बदलते. पण रावसाहेब दानवे यांनी त्यात काडीचा बदल होऊ दिला नाही. पाचवेळा खासदार, दोनदा आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात दोनवेळा राज्यमंत्री.

पण मतदारसंघात गेले की गावातल्या लोकांशी पारावर बसून गप्पा मारणे, शेतात औत हाकणे अशा अनेक त्यांच्या तऱ्हा सुरू असतात. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात तर त्यांनी आपला फाटलेला शर्ट जाहीरपणे दाखवत आपल्या साधेपणाचे ब्रॅन्डींग केल्याचेही पहायला मिळाले होते.

<div class="paragraphs"><p>Minister Raosaheb Danve</p></div>
ज्यांना ३२ हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी

तर असे हे दानवे अधूनमधून आपल्या साधेपणाचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत असतात. असाच एक रस्त्याच्या कडेला उपरणे टाकून जेवण करतांनाचा दानवे यांचा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.