Danve On Raut News : राऊतांचं काही खरं नाही, आता दानवेंनीही दिला इशारा..

Raosaheb Danve : संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार बद्दल हे सरकार फेब्रुवारीपर्यंत राहते का बघा? असे विधान केले होते.
Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News Aurangabad
Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News AurangabadSarkarnama

Maharashtra Political : शिवसेनेचे नेते संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडतात. त्यांच्या आरोप आणि टीकेमुळे सत्ताधाऱ्यांची गोची होते. मध्यंतरी झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर राऊत हे काही महिने तुरुंगात होते. Sanjay Raut त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजचा भोंगा आता बंद झाला, असा टोला लगावला होता. मात्र तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांची तोफ पुन्हा केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर धडधडायला लागली आहे.

Raosaheb Danve-Mp Sanjay Raut News Aurangabad
Ashok Chavan : शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंची पाठराखण का करत आहे ?

यावरून शिंदे सरकार मधील मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जास्त बोलू नका, तुम्ही जामीनावर सुटला आहात असे म्हणत धमक्याही दिल्या. (Shivsena) यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दानवे यांनी त्यांना थेट इशाराच दिला.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बद्दल भाकीत करत हे सरकार फेब्रुवारीपर्यंत राहते का बघा? असे विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती.

यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दानवे यांनी संजय राऊत हे फेब्रुवारीमध्ये कुठे असतील, हे त्यांना तरी माहीत आहे का? ते जामीनावर सुटले आहेत, ते बेदाग नाहीत, असा टोला लगावला. जेव्हा केव्हा राज्यात निवडणुका होतील तेव्हा संजय राऊत कुठे असतील, असा चिमटा काढत एक प्रकारे दानवे यांनी राऊतांना धमकीच दिली. दानवे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com