सात वर्षानंतर दाजी-मेव्हण्याचे मनोमीलन; चव्हाण पोहचले खतगावकरांच्या घरी

(Ashok Chavan- Khatgaonkar Meet After Seven years) २०१४ मध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कॉँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
Ashok Chavan-Khatgaonkar
Ashok Chavan-KhatgaonkarSarkarnama

नांदेड ः लोकसभा निवडणुकीच्या वेळी २०१४ मध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कॉँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या पक्षांतरामुळे दाजी - मेव्हुणामध्ये कौटुंबिक नातेही दुरावले होते. अखेर सात वर्षांनी पुन्हा एकदा हे नाते पुर्वपदावर आले आहे. खतगावकरांच्या घरवापसीमुळे आता खतगावकर आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यात मनोमिलम झाले आहे.

विधानसभेच्या देगलूर- बिलोलीच्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या खतगावकर यांनी अखेर भाजपला श्रीराम करत पुन्हा कॉँग्रेस पक्षात स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे काॅंग्रेस आणि पालकमंत्री चव्हाण यांनी स्वागत केले. त्यानंतर सोमवारी खतगावकर यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी पालकमंत्री चव्हाण यांनी भेट दिली.

सात वर्षानंतर या दोन नेते आणि दाजी-मेव्हुण्यामध्ये मनोमीलन झाल्याने जिल्ह्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास चर्चा तर झालीच, पण देगलूर बिलोली मतदारसंघात पुन्हा विजय मिळवण्याचा निर्धारही करण्यात आला. भाजपमध्ये खासदार खतगावकर यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खतगावकर यांची भेट घेऊन चर्चाही केली.

मात्र, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपातील एकाधिकारशाहीला कंटाळून अखेर त्यांनी पुन्हा कॉँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याचा निर्णय रविवारी (ता. १७) जाहीर केला. ऐन पोटनिवडणुकीत भाजपसाठी हा मोठा धक्का होता. राजकीय धक्के देण्यात माहीर असलेल्या अशोक चव्हाणांनी निवडणुक मतदानाआधीच भाजपला या निमित्ताने झटका दिला आहे. स्वगृही परतण्याच्या निर्णयानंतर अशोक चव्हाण आज खतगावकरांच्या राजेंद्रनगरातील बंगल्यावर पोहचले. तिथे खतगावकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

Ashok Chavan-Khatgaonkar
एकाधिकारशाहीचा आरोप करणारे खतगांवकर पक्षाशी किती एकनिष्ठ होते?

माझ्यात आणि अशोक चव्हाणांमध्ये मतभेद होते, पण आता कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण पुन्हा काॅंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सात वर्षानंतर जिल्ह्यातील या दोन मोठ्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या नेत्यांच्या मनोमिलनाने काॅंग्रेसला दहा हत्तींचे बळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com