Aurangabad : जमावबंदी आदेश सभेमुळे काढलेला नाही ; वर्षभर असे आदेश असतात..

सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावर लक्ष ठेवण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात. (Police Commissinoer)
Aurangabad : जमावबंदी आदेश सभेमुळे काढलेला नाही ; वर्षभर असे आदेश असतात..
Dr.Nikhil Gupta, Police CommissinoerSarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या शहरातील सभेला परवानगी नाकरण्यासाठीच पोलिसांनी ९ मे पर्यंत जमावबंदी आदेश जारी केल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर झळकल्या. (Police Commissinoer) त्यामुळे राज्यभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. (Aurangabad) या चुकीच्या गैरसमजातून काही वेगळे घडू नये यासाठी पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. (Marathwada)

जमावबंदी आदेश हे सभेमुळे किंवा इतर कारणांमुळे देण्यात आलेले नाहीत. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये याची खबरदारी म्हणून असे आदेश वर्षभर नियमित काढले जातात, हा एक नियमित प्रक्रियेचा भाग असून १४४ कलमाचे कुठलेही आदेश पोलिसांकडून काढण्यात आले नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या सभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, निर्णय झाल्यावर आपल्याला माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसेने पोलिस आयुक्तांकडे अर्ज देखील दाखल केला आहे. परंतु सभेला पाच दिवस बाकी असतांना देखील त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्यातच पोलिस आयुक्तांनी शहरात ९ मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्याच्या बातम्या धडकल्या. सभेला परवानगी द्यायची नाही, म्हणूनच पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश लागू केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. गैरसमज निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले.

Dr.Nikhil Gupta, Police Commissinoer
सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शुट अ‍ॅट साईट'? वळसे पाटलांचे स्पष्टचं सांगितले...

गुप्ता म्हणाले, औरंगाबादेत जमावबंदीचे कोणतेही आदेश काढलेले नाहीत. ही चुकीची माहिती असून कलम १४४ संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावर लक्ष ठेवण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात. कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत.

त्यामुळे हा एक नियमित आदेश आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. समाजात धरणे, आंदोलन, मोर्चा यांचा आम्ही दर पंधरा दिवसांनी आढावा घेत असतो. त्यामुळे हा आत्ता काढलेला आदेश नाही, हे आदेश वर्षभर असतात असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.