मुख्यमंत्री शिंदेंनी 'पेढे तुला' नाकारली अन् सभेतील गर्दी तुटून पडली...

Aurangabad : मुख्यमंत्र्यांच्या सभेत लाडू -पेढ्यांची पळवापळवी...
Aurangabad News
Aurangabad News Sarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज (ता.12 सप्टेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे हे सभा घेत आहेत.

दरम्यान औरंगाबादमधील बिडकीन येथे शिंदे यांच्या 'पेढे तुला'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिल्याने उपस्थित नागरिकांची ठेवलेल्या पेढे आणि लाडूंवर तुटून पडल्याचे बघायला मिळाले. यावेळी नागरिकांनी एव्हढी गर्दी केली की काही काळ येथे गोंधळ निर्माण झाला होता.

Aurangabad News
आता करुणा मुंडे घेणार भगवान गडावर दसरा मेळावा

झालं असं की,औरंगाबादमधील बिडकीन येथे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रेमापोटी 'पेढे तुला'चे आयोजन करण्यात आलं होते. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्याने सभा स्थळावरील नागरिकांनी गर्दी करत पेढे आणि लाडूच्या बॅाक्सची पळवापळवी केली. यामुळे मोठी गर्दी झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान मंत्री भूमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली असल्याचा आरोप शिवसेनेकडून (shivsena) करण्यात आला आहे. मात्र त्यावर शिंदे गटाकडून उत्तर देण्यात येत आहे.

Aurangabad News
`बीजेपी` आणि आरपीआय`ची आहे आघाडी `मनसे`ला मध्ये आणून करू नका बिघाडी

शिंदे गटावर सातत्याने होत असलेल्या टीकेला या सभेतून शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यांच्या या सभेला भाजप नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि इतर भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत.मंत्री भूमरे आणि मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर काय टीका करतात हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in