पीकविमा : आमदार कैलास पाटलांच्या उपोषणाला ३२६ ग्रामपंचायती, १४२ सोसायट्या अन ८२ संघटनांचा पाठिंबा

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या करीता आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचे उपोषण सोमवार (ता.२४) पासून चालू आहे.
MLA Kailas Patil's hunger strike supported by mp omraje Nimbalkar
MLA Kailas Patil's hunger strike supported by mp omraje NimbalkarSarkarnama

उस्मानाबाद : आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या पीकविम्यासाठीच्या (Crop insurance) उपोषणास उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा मिळत असून आता कार्यकर्त्यांनी शिवसेना (shivsena) स्टाईलने आंदोलन करण्याचे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केले आहे. जिल्ह्यात ३२६ ग्रामपंचायती, उपोषणास पाठिंबा दर्शविला असून ८२ संघटना, १४२ सोसायटी तसेच विविध पक्षांनीही पाठिंबा दर्शविला आहे. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास हजारो शिवसैनिक, शेतकरी दररोज येवून भेटून जात आहेत, असेही खासदार निंबाळकर म्हणाले. (Crop insurance: MLA Kailas Patil's hunger strike supported by 326 gram panchayats, 142 societies & 82 organizations)

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या करीता आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचे उपोषण सोमवार (ता.२४) पासून चालू आहे. २०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, ५३१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईचा विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये. २०२१ च्या पीकविम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम विमा पात्र सहा लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.

MLA Kailas Patil's hunger strike supported by mp omraje Nimbalkar
शिंदे गटातील खासदाराने शिवसेनेतील बहिणीच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज!

सप्टेंबर २०२२ मधील सततचा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी २४८ कोटी रुपये जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे एक हजार दोनशे कोटी रुपये तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम असल्याचेही खासदार राजेनिंबाळकर यानी सांगितले.

MLA Kailas Patil's hunger strike supported by mp omraje Nimbalkar
क्रांतीसिंह नाना पाटील अन्‌ बबनराव ढाकणे हे परजिल्ह्यातील नेतेही बीडमधून लोकसभेत गेले!

शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी विविध स्तरावर उपोषणास पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यात ३२६ ग्रामपंचायतींनी उपोषणास पाठिंबा दर्शविला असून ८२ संघटना, १४२ सोसायटी तसेच विविध पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास हजारो शिवसैनिक, शेतकरी दररोज येवून भेटून जात आहेत. त्यामुळे सरकारने व जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेवून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची भरपाई तात्काळ जमा करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com