पवारांवर टीका केली की जेल, मग अमृता फडणवीसांबद्दल असभ्य भाषा वापरणारे मोकाट का ?

शिवाजी महाराजांच्‍या राज्‍यात महिलेकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे डोळे काढण्‍यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार महिलांवर असभ्‍य भाषेत टीका केली तरी शांत का? (Sambhajipatil Nilangekar)
पवारांवर टीका केली की जेल, मग अमृता फडणवीसांबद्दल असभ्य भाषा वापरणारे मोकाट का ?
Sambhaji Patil Nilangekar News, Sharad Pawar News, Amruta Fadanvis News, Latur Marathi NewsSarkarnama

लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर सरकार चालवत असल्‍याचा दावा करणा-या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात पवार साहेबाविषयी महिलांनी असंवैधानिक भाषा वापरल्‍यास त्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍यात येते. (Bjp) मात्र अमृता फडणवीस यांच्‍या सारख्‍या महिलांबाबत सातत्‍याने असभ्‍य भाषा वापरणारे मोकाट कसे ? असा प्रश्‍न उपस्थित करत माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी महाविकास आघाडी सरकारच्‍या दुटप्‍पी धोरणावर टीका केली. (Latur Marathi News)

सध्‍या महाराष्‍ट्रात वेगळ्या पध्‍दतीने गुन्‍हे दाखल करण्‍याची परंपरा महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात सुरू झाले असल्‍याचे सांगत निलंगेकर यांनी समाज माध्‍यमांत कोणी टीका केली तर त्‍यांच्‍यावर अनेक ठिकाणी गुन्‍हे दाखल करण्‍याची प्रथा सुरू झाल्याचे म्हटले आहे. (Sharad Pawar) काही दिवसापूर्वीच केतकी चितळे या तरुणीने एक कविता फेसबुकवर पोस्ट केली आणि तिच्‍यावर राज्‍यात विविध ठिकाणी गुन्‍हे दाखल झाले. (Latur)

भाषेवर आक्षेप नोंदवत सदर भाषा असंवैधानिक असल्‍याचा दावा करत तिला अटकही करण्‍यात आली आहे. अदयाप तिची सुटका झालेली नाही. संसद सदस्‍य नवनीत राणा यांच्‍यासोबत देखील असाच प्रकार घडला आणि त्‍यांनाही १५ दिवस तुरूंगात काढावे लागले.आपल्‍या नेत्‍यावर आक्षेपार्ह भाषेत कोणी टीका केली तर त्‍याला अशाच पध्‍दतीने अडकावयाचे असे ठरविले जाऊ लागल्याचा आरोपही निलंगेकर यांनी केला.

त्‍यांच्‍या नेत्‍यांनवर टीका झाल्‍यास गुन्‍हे दाखल करून तुरूंगात टाकण्‍याचा पराक्रम महाविकास आघाडी सरकारकडुन होवू लागला आहे. हाच न्‍याय विरोधी पक्षातील नेते किंवा महिलांबाबत असभ्‍य भाषा बोलल्‍यास का लागु होवू नये ? यापूर्वी अमृता फडणवीस यांच्‍यावर असभ्‍य भाषेत सातत्‍याने टीका करण्‍यात आली. एक स्‍त्री म्‍हणुन त्‍यांच्‍यासाठी योग्‍य भाषा वापरली गेली नाही. अतिशय खालच्‍या स्‍तरावर त्‍यांच्‍यावर टीका करण्‍यात आली.

समाज माध्‍यमांवर सुध्‍दा अशाच पध्‍दतीची टीका झाल्‍याचे सर्वांनीच पाहिले आहे. काही दिवसापूर्वीच औरंगाबाद येथील सभेत संजय राऊत यांनी केंद्रीयमंत्री स्‍मृती इराणी यांच्‍याबाबत जाहीर भाषणात अशाच पध्‍दतीची असभ्‍य भाषा वापरली होती. मात्र या दोन्‍ही महिलांवर असभ्‍य भाषेत टीका करणारे अद्याप मोकाटच आहेत. जर जेष्‍ठ नेत्‍यावर टीका करणारी महिला कायद्याच्या कचाट्यात अडकवली जात असेल, तर मग महिलेवर असभ्‍य भाषेत टीका करणा-या व्‍यक्‍तींवरही कार्यवाही व्‍हायलाच हवी,अशी मागणीही निलंगेर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

Sambhaji Patil Nilangekar News, Sharad Pawar News, Amruta Fadanvis News, Latur Marathi News
Aurangabad : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शिवसेनेची पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या आदर्शावर आम्‍ही सरकार चालवत आहोत असे सांगणारे महाविकास आघाडी सरकार नेमके कोणाच्‍या इशा-यावर चालत आहे हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍यात महिलेकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे डोळे काढण्‍यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार महिलांवर असभ्‍य भाषेत टीका केली तरी शांत का आहे ?असा सवाल देखील निलंगेकर यांनी उपस्थितीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in