बियाणांच्या 84 कंपन्यांवर गुन्हे दाखल : कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी केले हे आवाहन

राज्यातील महाबिज सह काही कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे पेरल्यावर नीट उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत.
बियाणांच्या 84 कंपन्यांवर गुन्हे दाखल : कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी केले हे आवाहन
Eknath DawaleSarkarnama

लातूर - राज्यातील महाबीज सह काही कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे पेरल्यावर नीट उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेले सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्यांने त्या विद्यापीठालाही ग्राहक न्यायालयाने शिक्षा सुनावून आठवडा झाला नाही. तोच राज्यातील कृषी विभागाने बियाण्यांच्या 64 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशातच पावसाळा तोंडावर आल्यामुळे राज्यातील बियाण्यांबाबत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. त्यादृष्टीने राज्यातील कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( Crimes filed against 84 seed companies: Appeal made by Principal Secretary, Department of Agriculture )

लातूर हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख आहे. राज्यात दरवर्षी बोगस बियाणांच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहे. मागील वर्षी राज्यात कंपन्यांवर विविध ठिकाणी 84 ठिकाणी गुन्हे दाखल केले. यावर घरातील सोयाबीनचे बियाणे वापरावे असे आवाहन करत आहेत. राज्यात खताचा तुटवडा भासणार नसल्याचे राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा इथे मनरेगातून ग्राम समृध्दी कार्यशाळेत बोलताना सांगितले आहे.

Eknath Dawale
'महाबीज' संचालकपदी खासदार संजय धाेत्रेंचा पाचव्यांदा दणदणीत विजय

औस तालुक्यातील नागरसोगा इथे आज क्रिएटिव्ह फाऊंडेशनद्वारा मनरेगातून ग्राम समृध्दी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ डवले म्हणाले की, दरवर्षी सोयाबीन बोगस बियाणांच्या तक्रारी येत असत. गतवर्षी एक लाखांच्या जवळपास तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान महाबीजचे सोयाबीन बियाण शेतकऱ्यांना बदलून देण्यात आले होते तर अन्य कंपन्यांवर राज्यात विविध ठिकाणी 84 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Eknath Dawale
'सोयाबीन उत्पादक मोदी सरकारवर खूष आहेत'

ते पुढे म्हणाले, नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आढावा बैठक घेवून शेतकऱ्यांच्या खत आणि बियाणांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यात कोणतीही तडजोड करू नका असे आदेश दिले. चालू वर्षी खत आणि बियाणांच्या तुटवडा भासणार नसल्याचे एकनाथ डवले यांनी सांगितले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in