वक्फ बोर्डाची जमीन हडपल्या प्रकरणी एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा

बीड शहरातील सर्वे नं.२० ही जमीन सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित खिदमतमाश आहे. या जमिनीची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. (Aimim Beed)
Waqf Bord Beed
Waqf Bord BeedSarkarnama

बीड : वक्फ बोर्डाने ५१ वर्षांच्या करारावर भाडे तत्वावर दिलेली शहरातील सर्वे नं.२० इ मधील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड (Beed) यांच्या संबंधित असलेली खिदमतमाश जमीन स्वतःच्या नावावर करून घेणार्‍या एआयएमआयएमचे (Aimim) माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम शेख जैनोद्दीन व त्यांचे वडील शेख जैनोद्दीन शेख सुजाओद्दीन यांच्यावर १५ जानेवारी रोजी बीड शहर ठाण्यात फसवणूक आणि वक्फ (Waqf Bord) अधिनियम १९५४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुज्जम खलीखुज्जम यांनी बीड शहर ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार सर्वे नं.२० मधील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित असलेली खिदमतमाश जमीन मराठवाडा वक्फ ऑफ बोर्ड पंचक्की यांनी २८ ऑक्टोबर १९९३ साली ठराव घेवून हाजी शेख सुजाउद्दीन दादामियॉ, शेख जैनोद्दीन शेख सुजाउद्दीन व मिर्झा शफीक बेग मिर्झा उस्मान बेग (सर्व रा.सुभाष रोड, बीड) यांना १४ सप्टेंबर १९९४ रोजी ५१ वर्षांसाठी दरवर्षी ५ हजार रूपये किरायाने दिली होती.

२० रूपये किंमतीच्या बॉण्डवर ३८ हजार चौरस फुट जमीन भाडे तत्वावर तेव्हा देण्यात आली. संबंधितांकडून देणगी म्हणून ५० हजार रूपयांची रक्कम भरून घेण्यात आली. दरम्यान हाजी शेख सुजाउद्दीन यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा शेख जैनोद्दीन व त्याचा मुलगा शेख निजाम यांनी संगनमत करून ३० जून २००१ रोजी खिदमतमाश जमीन मदतमाश म्हणून फेर क्रमांक ५५४ अन्वये बेकायदेशीररित्या स्वतःच्या मालकीची करून घेतली.

फेरफार क्रमांक ५५४ संबंधाने मराठवाडा वक्फ बोर्डामार्फत जिल्हा वक्फ अधिकारी शेख मकसूद व सय्यद जाफर यांनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे शेख पिता-पुत्राविरूध्द अपिल दाखल केले होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रशांत शेळके यांनी सदरचा फेर रद्द केलेला असून वक्फ बोर्डाचे सीईओ यांनी ३० जून २००१ चा उपजिल्हाधिकारी भूसुधार यांचा आदेश रद्द होण्यासाठी महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अपिल दाखल केले होते.

Waqf Bord Beed
तेरणा ताब्यात येण्याआधीच प्रक्रिया रद्द; सावंतांना धक्का

त्यानुसार महसूल राज्यमंत्र्यांनी १४ फेब्रुवारी २००६ रोजी २००१ चा आदेश रद्द करण्याबाबतही आदेश पारीत केलेले आहेत. शेख निजाम व शेख जैनोद्दीन यांनी सर्वे नं. २० इ जमीन त्यांना विश्वासाने भाडेतत्वावर दिलेली असतांना विश्वासघात करत उपजिल्हाधिकारी शेळके यांच्या नावाचा व सही शिक्क्याचा बनावट आदेश तयार करून वक्फ बोर्डाच्या मालकीची जमीन संगनमताने स्वतःच्या नावे करून तिथे बांधकाम केले.

उपजिल्हाधिकार्‍यांचा बनावट आदेश

बीड शहरातील सर्वे नं.२० ही जमीन सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित खिदमतमाश आहे. या जमिनीची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. सदरील जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर असतांना दोन्ही आरोपींनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या नावाचा व शिक्क्याचा बनावट आदेश तयार केला.

त्या आदेशाद्वारे नगर भू-मापन क्रमांक १९१८ अखिव पत्रिकामधील अध्यक्ष मराठवाडा वक्फ बोर्डाचे नाव असतांना फेर नंबर ५२८० प्रमाणे स्वतःचे नाव समान हिस्सा नोंद केले. त्याआधारे पीआरकार्ड तयार करून मालकी ताबा दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com