Aurangabad : लाचखोर शाखा अभियंत्याच्या तिजोरीत घबाड ; ८५ तोळे सोनं अन् २६ लाख रोख..

शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पाटीलने संबंधित व्यक्तीकडे सव्वा लाखाची लाच मागितली होती. (Anti Corruption Bureau)
Anti Corruption Raid In Aurangabad
Anti Corruption Raid In AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम झाल्यानंतर त्याचे बील काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियंत्याने सव्वा लाखाची लाच एक कंत्राटदाराकडे मागितली होती. (Aurangabad) तडजोडी नंतर चाळीस हजारांचा पहिला हप्ता घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) त्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले होते. आज पथकाने त्याच्या लाॅकरची झडती घेऊन लाॅकर उघडले तर त्यात दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांची तब्बल २६ लाखांची बंडल सापडली. (PWD)

एवढेच नाही, तर ८५ तोळे सोनं असे मोठे घबाडच एसीबीच्या हाती लागले आहे. हे पाहून तपास अधिकारी देखील अवाक झाले. या लाचखोर अधिकाऱ्याने अजून कुठेकुठे संपत्ती दडवून ठेवली आहे, याची चौकशी पथक करत आहे. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता संजय पाटील याच्या मुसख्या एसीबीने दोन दिवसांपुर्वीच आवळल्या होत्या.

शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पाटीलने संबंधित व्यक्तीकडे सव्वा लाखाची लाच मागितली होती. तडजोडीनंतर चाळीस हजाराचा पहिला हप्ता घेतांना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पाटील याला रंगेहाथ पकडले. चौकशीनंतर पथकाने पाटील यांच्या बॅकेतील लाॅकरची तपासणी केली आणि मोठ घबाडंच पथकाच्या हाती लागले.

Anti Corruption Raid In Aurangabad
चिकटगांवकरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, तुम्हीही विधानसभेत पाहिजे..

अटक झाल्यानंतर त्याची घराची झडती घेतली तेव्हा एक लाॅकर असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी लाॅकर उघडत झडती घेतली तेव्हा ते सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन हजार, पाचशे आणि शंभरच्या नोटांच्या बंडलनी भरलेले होते. हे पाहून तपास अधिकारीही अवाक झाले. लॉकरमध्ये ८५ तोळे सोन्याचे दागिने आणि २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम होती.

एका लाॅकरमधून एवढे घबाड हाती आले आहे, अशी आणखी काही लाॅकर आहेत का? बॅंकेत किती पैसे आहेत, तिथल्या लाॅकरमध्ये काय आहे? याचाही एसीबीचे पथक तपास करणार आहे. लाचखोर संजय पाटील याने लाचेच्या पैशातून मोठी संपत्ती जमवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एसीबीकडून पाटील याच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्यात येणार असल्याचेही समजते. त्यामुळे पथकाच्या हाती आणखी काय काय लागते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com