Rajesh Tope : कोरोनाचे रुग्ण फक्त मुंबई, पुण्यात ; मंकी पाॅक्स राज्यातच काय पण देशातही नाही..

मंकी पाॅक्स या संसर्गजन्य रोगाचा, तर राज्यात काय तर देशात देखील या आजाराचा एकही रुग्ण सध्या नाही. दक्षिण अफ्रिकेतून या आजाराचा प्रसार होत आहे. जनावराच्या संपर्कातून माणसाला या आजाराची लागण होते. (Rajesh Tope)
Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh TopeSarkarnama

औरंगाबाद : राज्यात ३६ जिल्हे आहेत, या पैकी फक्त साडेतीन हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील अडीच हजार एकट्या मुंबईत तर उर्वरित ठाणे आणि पुण्यात आढळले आहेत. या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहे. (Corona) ते होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत, कुणालाही रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचे काही कारण नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याशिवाय मंकी पाॅक्स हा संसर्गजन्य रोग देखील पसरू लागला आहे, याबद्दल देखील चिंता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra) या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मात्र चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगत जनतेला दिलासा दिला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना राजेश टोपे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे, ही गोष्ट खरी असली तरी ती संपुर्ण राज्यात नाही तर मोजक्या दोन-तीन जिल्ह्यांमध्येच आहे. शिवाय त्यांच्या अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. ३६ पैकी फक्त तीन जिल्ह्यात कोरोनाचे साडेतीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. यातील अडीच हजार मुंबईत तर उर्वरित हे पुणे आणि ठाणे जिल्ह्यात आहेत.

Health Minister Rajesh Tope
Shivsena : हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा ; उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबादेत स्तंभपूजन

परंतु एकाही रुग्णाला हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही. सौम्य लक्षणे असल्यामुळे हे सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राहिला प्रश्न मंकी पाॅक्स या संसर्गजन्य रोगाचा, तर राज्यात काय तर देशात देखील या आजाराचा एकही रुग्ण सध्या नाही. दक्षिण अफ्रिकेतून या आजाराचा प्रसार होत आहे.

जनावराच्या संपर्कातून माणसाला या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात अद्याप एकही मंकी पाॅक्सचा रुग्ण आढळलेला नाही. हा संसर्गजन्य रोग आपल्या देशात येऊ नये यासाठी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर तपासणी केली जात असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com