वादग्रस्त वक्तव्यामुळे दानवे पुन्हा अडचणीत; नाभिक संघटना झाल्या आक्रमक

महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

अहमदनगर : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आपल्या बोलण्याच्या खास शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यांचा एक मोठा चाहता वर्गही आहे. मात्र, दानवेंचे हेच बोलणे त्यांच्या पुन्हा एकदा अंगलट आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका करत असतांना दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आला असून नगरमध्ये दानवेंचा निषेधही करण्यात आला आहे. दानवेंनी नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत दानवेंची मात्र, कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

Raosaheb Danve
छगन भुजबळांनी तर इच्छुकांवर बाॅम्बच टाकला : नवीन वाॅर्डरचनेची घोषणा

आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाभिक महामंडळाच्या वतीने दानवे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली असून संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. निवेदनात म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना मंत्री दानवे यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी म्हणजे अर्धवट काम करणारे तिरुपतीचे न्हावी आहेत, असे वक्तव्य दानवेंनी केले आहे. या विधानामुळे तिरुपती येथील नाभिक व्यवसायिक तथा समस्त नाभिक समाजाची बदनामी झाली. त्यामुळे दानवेंनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

Raosaheb Danve
कुकडीच्या पाण्यावरून राम शिंदे आक्रमक होणार

यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी विकास मदने म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पदावर असलेल्या व्यक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रपुरुष, समाजाबद्दल अपशब्द वापरत आहेत. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखवल्या जाताता. समाज-जातीबद्दल अपशब्द काढणाऱ्यांवर जबर बसेल, अशा स्वरुपाने कायदे होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Raosaheb Danve
ओबीसी आरक्षणासाठी आता महिला सरसावल्या, पुसदमध्ये निदर्शने...

दरम्यान, दानवे हे बोलण्याच्या ओघात बोलून गेले. मात्र, आता ते वादात सापडले आहे. असे त्यांच्यासोबत अनेकदा झाले आहे. पाठिमागेही असेच एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळीही त्यांना शेतकऱ्यांच्या व विरोधकांच्या रोषाला सोमोरे जावे लागले होते. आता जातीवाचक टिप्पणी केल्याने हा नवीनच वाद दानवेंच्या पाठीमागे लागला आहे. यावर दानवे आता काय स्पष्टीकरण देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in