कंत्राटदार चाकूचा धाक दाखवून बोगस बिलांवर सह्या घेतात, मला रिव्हाॅल्व्हर द्या..

येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात. (Beed District)
Public Works  Department
Public Works DepartmentSarkarnama

बीड : माफियाराज, गुंडाराज, गुटखाकिंग, जुगार अड्डे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधकांकडूनही सातत्याने टीका होत असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात आणखी एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. (PWD) कंत्राटदार चाकूचा, कट्यारीचा धाक दाखवून बोगस बिलांवर सह्या घेतात, असा गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन रिव्हाॅल्व्हरची मागणी केली आहे. (Marathwada)

अंबाजोगाईच्या बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार आणि कंत्राटदारांची दहशत या निमित्ताने समोर आली आहे. `कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात`, असा आरोप खुद्द बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच केला आहे.

या संदर्भात संबंधित अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून रिव्हाॅल्व्हरची मागणी देखील केली आहे. अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहले आहे.

आपल्याला दहशतमुक्त वातावरणात कामकाज करता यावे, तसेच स्वसंरक्षणाच्या हेतूने मला रिल्व्हाॅल्व्हर वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे.

Public Works  Department
शाळा बंद, मग शिक्षकांनी वडापाव विकावा का? विनाअनुदानित शिक्षक संतापले

कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात, असा गंभीर आरोप देखील कोकणे यांनी केला आहे.

त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या या मागणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in