Mla Dhiraj Deshmukh On Karnataka Victory : कर्नाटकाच्या जनतेला दिलेली विकासाची गॅरंटी काॅंग्रेस पुर्ण करेल...

Congress : कर्नाटकची एकहाती सत्ता तेथील जनतेने आता सुरक्षित हातात दिली आहे.
MLA Dhiraj Deshmukh News
MLA Dhiraj Deshmukh NewsSarkarnama

Latur Congress : जनमानसाच्या मनात असलेली काँग्रेस (Congress) पक्षाची वॉरन्टी आणखी वाढली आहे, हे मतदारांनी आजच्या कर्नाटक विधानसभा निकालातून दाखवून दिले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कायमच लोकांचे प्रश्न मांडले. महागाई, रोजगार अशा सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना काँग्रेसने 'आवाज' दिला.

MLA Dhiraj Deshmukh News
Ashok Chavan On Karnataka Result : `भारत जोडो` यात्रेचा इम्पॅक्ट कर्नाटक निवडणुकीत दिसला..

या आवाजाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे हा निकाल आहे, अशा शब्दात लातूर ग्रामीणचे काॅंग्रेस आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी आनंद व्यक्त केला. २०२४ मध्ये देशाला नवी दिशा देणारा हा निकाल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Karnataka Election) जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरोधी पक्षांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवले आहे.

काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, (Rahul Gandhi) प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर विश्वास दाखवित कर्नाटकची एकहाती सत्ता तेथील जनतेने आता सुरक्षित हातात दिली आहे.

याबद्दल कर्नाटक जनतेचे मनापासून आभार. काँग्रेसचा भर हा कायमच विकासावर असतो. त्यामुळे विकासाची दिलेली गॅरन्टी काँग्रेस पक्ष नक्कीच पूर्ण करेल आणि मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल, याचा विश्वास असल्याचे धिरज यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे.

संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर असून भाजप ६४ जागांवर आघाडीवर आहे. काॅंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून लवकरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवला जाणार आहे. या पदासाठी दावेदार असलेल्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com