कॉंग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार; रामदास आठवलेंचा दावा

Ramdas Athwale news| congress| आम्ही शिवसेनेला अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी आम्हाला धोका दिला.
Ramdas Athwale news, Mahavikas Aghadi News
Ramdas Athwale news, Mahavikas Aghadi News

औरंगाबाद : महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नाही. काँग्रेस पाठिंबा काढणार आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडणार, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केला आहे.इतकंच नव्हे तर काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षांसाठी आम्ही सत्ता बनवणार असल्याचेही आठवले म्हणाले. (Ramdas Athwale news)

औरंगाबाद येथील विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही अलेबल नसल्याच चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेस मध्ये सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले की, काँग्रेस पाठिंबा काढणार आणि तीन पक्षाचं सरकार पडणार असे राज्याचे चित्र आहे. आम्ही शिवसेनेला अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी आम्हाला धोका दिला, असा आरोपही आठवलेंनी केला.

Ramdas Athwale news, Mahavikas Aghadi News
बबनराव ढाकणेंनी भावूक होऊन प्रतापरावांच्या गळ्यात घातला हार : पिता-पुत्रांना झाले अश्रू अनावर

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपचाच विजय होणार. भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याने आम्हाला घोडेबाजार करण्याची गरजच नाही. भाजपकडे विजयासाठी लागणारे संख्याबळ सुद्धा आहे. सातवा उमेदवार आधी त्यांनी टाकला, आम्ही नाही. मग आम्हालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असल्याने तेही आम्हाला मतदान करु शकतात आणि सर्व अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहे, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने यापूर्वी संधी दिली होती. पण शिवसेनेने शब्द पाळला नाही. राजे आमच्या सोबत पहिल्यापासून राहिले नाही. राजेंनी सुरवातीपासून अपक्ष राहण्यावर ते ठाम होते. त्यामुळे संभाजीराजेंना भाजपने नक्की काहीतरी दिले असते, असं आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com