फोन टॅपिंग कारवाईमुळेच फडणविसांनी पेन ड्राईव्ह प्रकरण उकरून काढले!

गांधी परिवाराच्या नेतृत्वात 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशांमध्ये सत्ता बदल घडणार.
nana patole, devendra fadnavis
nana patole, devendra fadnavis sarkarnama

परभणी : गांधी परिवाराच्या नेतृत्वात 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशांमध्ये सत्ता बदल घडणार आहे. त्यामुळे आम्हाला कोणी सल्ला देण्याच्या गरज नाही. ज्या काँग्रेसच्या (congress) जीवावर अनेक वर्ष राजकारण केले. त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नाना पटोले परभणीमध्ये बोलत होते. व्हिएतनाम येथील पंचधातूच्या, तथागत गौतम बुद्ध मूर्ती वितरण सोहळ्यासाठी पटले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना. रामदास आठवले यांच्यावर टीका केली. यावेळी पटोले म्हणाले, सीबीआय मागे लावतात आणि आपल्याला कायदेशीर नोटीस मिळाली की राजकारण असे म्हणता. त्यामुळे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटे असतात. ते विसरले नाही पाहिजे. असे म्हणत पटोले यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.

nana patole, devendra fadnavis
रश्मी शुक्लांच्या काळात आयुक्तालयात दबदबा असणारा पोलिसांच्या जाळ्यात

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सत्ताबदल होणार अशी चर्चा रंगली आहे. त्यावर नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असून, सरकार पाच वर्षेपूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

राज्याचा अर्थसंकल्पामध्ये ऊर्जा खात्याला कमी निधी मिळाला. त्यामुळे काँग्रेसकडे असलेल्या मंत्रालयाला, कमी निधी मिळतो का असे विचारले असता, पटोले म्हणाले, याविषयी आम्ही वित्त मंत्र्यांना बोललो आहोत. लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर लवकरच चर्चा होणार आहे. चर्चे दरम्यान आम्ही अधिक बजेट मागून घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील छोटे उद्योग आणि शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ असे ते म्हणाले.

nana patole, devendra fadnavis
Fadnavis Pen Drive : चव्हाणांना घड्याळच भेट द्यायचे, हे तेजस मोरेने ओळखले होते..

देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राइवबॉम्ब हा फुसका आहे. त्यांनी तत्कालीन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून अनेक नेत्यांचे फोन टॅप (Phone Tapping) केले आहेत. त्यात भाजपच्या अनेक नेत्यांचेही फोन टॅप केले आहेत. पेनड्राईव्हमध्ये नेमके काय आहे. ते कुठून आले आहे याचे उत्तर उद्या सभागृहात गृहमंत्री देणार आहेत. मात्र, आता कारवाई सुरू झालेली आहे. त्यामुळे सरकारला दबावात आणण्याचा अयशस्वी प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com