Nanded Congress News: अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा ; वाढदिवसानिमित्त पोस्टर...

Ashok Chavan's Daughter News: श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री झाल्यास चव्हाणांची ही तिसरी पिढी ठरणार आहे.
Congress News Nanded
Congress News Nanded Sarkarnama

Marathwada News: राजकारणातील घराणेशाहीवर नेहमीच टीका केली जाते. पण आमच्या मुलांमध्ये नेतृत्व गुण असतील, लोक त्यांना स्वीकारणार असतील तर काय हरकत आहे? अस समर्थन देखील नेते मंडळी करतांना दिसतात. (Congress News Nanded) राज्याचे माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.

Congress News Nanded
youth Congress Ledadr Sharan Patil News : माजी मंत्री बसवराज पाटलांच्या मुलाच्या लग्नात राजकारण्यांसह संत, महंतांचीही हजेरी...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा (Nanded) नांदेडमध्ये दाखल झाली होती, तेव्हा श्रीजया त्यांच्यासोबत चालतांना दिसल्या. या यात्रेच्या नियोजनातही त्यांनी वडील अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मदत केली होती, असे सांगितले जाते. तेव्हापासूनच श्रीजया यांच्या सक्रीय राजकारणातील एन्ट्री झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.

आता त्यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा देण्यात आल्यामुळे श्रीजया येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. (Marathwada) श्रीजया अशोक चव्हाण यांचा २५ मे रोजी वाढदिवस असतो. या निमित्ताने नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांना संपुर्ण चव्हाण कुटुंबियांचा फोटो बॅनरवर छापत त्यावर श्रीजया यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.

या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. अशोक चव्हाण यांचा भोकर मतदारसंघ श्रीजया यांच्यासाठी सुरक्षित समजला जातो. पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढायला सांगितले, तर श्रीजया या भोकरमधून लढतील असे देखील बोलले जाते. तुर्तास त्यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री झाल्यास चव्हाणांची ही तिसरी पिढी ठरणार आहे. भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण, पत्नी अमिता चव्हाण यांनी यापुर्वीच निवडणूक लढवली आहे. आता श्रीजया देखील याच मतदारसंघातून विधानसभा लढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com