Beed : नव्या सरकारमध्ये काँग्रेसी पद्धत; दिल्लीशिवाय पान हलत नसल्याने निम्मे मंत्रीमंडळ होईना..

आताही राज्याचा कारभार २० मंत्र्यांवरच सुरु आहे. कोणाकडे दोन तर फडवीस खुद्द सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळत आहेत. (Beed News)
Eknath Shinde, Devendra Fadanvis  News
Eknath Shinde, Devendra Fadanvis NewsSarkarnama

बीड : विद्यमान सरकारनेही आता जणू जुनी काँग्रेसी संस्कृती अंगीकारल्याचे चित्र आहे. सरकार स्थापन होऊन पावणे पाच महिने होत आले असले तरी राज्यात निम्मे मंत्रीमंडळ नाही आणि दिल्लीच्या इशाऱ्याशिवाय विद्यमान सरकारचेही पान हालत नाही हेही स्पष्ट झाले आहे. भाजपसाठी फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्या आणि दिल्लीचे ग्रीन सिग्नल ठिक आहे. पण, स्वत:चा स्वतंत्र पक्ष असताना शिंदे यांच्यावरही दिल्लीवाऱ्यांची वेळ का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis  News
Congress : राज्यपालांना हटवा, आफताबला फाशी द्या ; काॅंग्रेसची मागणी..

पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याजिल्ह्यांत धोरणात्मक निर्णयांना उशिर, विकासाला बसलेली खिळ आणि सरकारकडून भलत्याच मुद्द्यांकडे लक्ष वळविण्याच्या प्रकारामुळे सुरुवातीला असलेले सरकारबद्दलचे कुतूहल देखील कमी झाले आहे. (Eknath Shinde) तत्कालिन आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसमध्ये निर्णय लवकर व्हायचे नाहीत. (Devendra Fadanvis) मंत्रीमंडळाचा विस्तार असो किंवा संघटनेतील फेरबदल असो. याबाबत दिल्लीतून खलिता आल्यानंतरच निर्णय व्हायचा. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन वर्षे लोटूनही महामंडळांचे वाटप झालेच नाही.

राज्यातील काँग्रेसचे पान दिल्लीशिवाय हालत नाही, निर्णय वेळेवर होत नसल्याने विकासाला खिळ बसलीय, अशी टिका तेव्हा भाजपकडून केली जायची. पण, आता भाजपनेही तीच `री` ओढायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यात त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सहभागी केले आहे.राज्यात शिवसेनेतील राजकीय भूकंपानंतर ३० जुनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराला सव्वा महिना लागला. यानंतर खातेवाटपालाही आठवडाभराचा वेळ लागला.

पालकमंत्र्यांच्या निवडीलाही पुन्हा दहा दिवसांचा कालावधी लागला. आताही राज्याचा कारभार २० मंत्र्यांवरच सुरु आहे. कोणाकडे दोन तर फडवीस खुद्द सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळत आहेत. मंत्री म्हणून एखाद्याकडे दोन-तीन खाते पेलण्याची क्षमता असते. मात्र, अलिकडे नैसर्गीक आपत्तीच्या घटनांमध्ये पालकमंत्री जिल्ह्यात फिरकायला महिना लागतो. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे.

भलेही आमदारांसह सत्तेबाबत काही प्रकरणे न्यायालयात असल्याने संभाव्य निकालाची भीतीही असू शकते. पण, आज सत्तेत आहोत तर पूर्ण क्षमतेने निर्णय घेण्यासाठी व सरकार चालविण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळाचा विस्तार का नाही, असाही प्रश्न आहे. दिल्लीतून निर्णयाची काँग्रेसवर टिका करणाऱ्या भाजपमध्येही आता देवेंद्र फडणवीसांसारखे सक्षम नेतृत्व असतानाही विधान परिषद व राज्यसभेच्या उमेदवाऱ्या, मंत्रीपदांचे वाटप असे सगळेच निर्णय दिल्लीतूनच व्हायला लागलेत.

Eknath Shinde, Devendra Fadanvis  News
Bjp : लव्ह जिहाद प्रकरणातून धर्मांतराचा डाव ; सावेंचा खासदार इम्तियाज यांच्यावर आरोप..

त्यांच्याबाबतच उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय देखील याचाच भाग आहे. भाजपचे ठिक पण ४० आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडत राजकीय नेतृत्व व कतृत्व सिद्ध करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दिल्लीवाऱ्या कराव्या लागण्याचे कारण देखील कळण्यापलिकडे आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंचे बंड, राजकीय कौशल्य व धाडस आणि आमदारांची संख्या अधिक असतानाही शिंदेंना मुख्यमंत्रीपद यामुळे शिंदे व सरकार या दोन्हीबद्दल जनमाणसांत वेगळीची प्रतिमा निर्माण झाली होती.

परंतु, अलिकडे आपत्तीच्या काळात सरकारकडून केवळ आडवा - जीरवाचे राजकारण, लक्ष विचलीत करण्यासाठी वेगळे मुद्दे पुढे करणे, धोरणात्मक निर्णयांना होणारा उशिर यामुळे सामान्यांमध्ये असलेली सरकारच्या प्रतिमेची शायनिंग कमी झाली आहे. फक्त सरकारकडे मेजॉरिटी हीच मोठी जमेची बाजू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in