Congress : `भारत जोडो` उद्या महाराष्ट्रात, देगलूरमध्ये पहिला मुक्काम..

सोमवारी सायंकाळी सात वाजता शहराच्या प्रवेशद्वारावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. (Ashok Chavan)
Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Rally In Maharashtra News, NandedSarkarnama

नांदेड : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली भारत जोडो यात्रा सोमवारी (ता. सात) सायंकाळी महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल होणार आहे. पक्षातर्फे यात्रेची तयारी पूर्ण झाली असून राज्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. राज्यात जवळपास १४ दिवस यात्रा असून नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून ती पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे.

Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo : शरद पवार थेट नांदेडच्या सभेतच सहभागी होणार..

यात्रेबाबत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही कायम टिकवण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची ही यात्रा सुरू झाली आहे. (Congress) तेलंगणाच्या सीमेवरून देगलूरमार्गे महाराष्ट्रात ही यात्रा सोमवारी (ता. सात) सायंकाळी साडेसात वाजता दाखल होणार आहे. त्यानंतर ती देगलूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतून मध्य प्रदेशात जाणार आहे. या यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी सायंकाळी सात वाजता शहराच्या प्रवेशद्वारावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मशाल यात्रा वन्नाळीपर्यंत निघणार आहे. गुरूद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी येथे मशाल यात्रेचा समारोप होईल. यात्रेत येणाऱ्या अती महत्त्वाच्या भेटीसाठी देगलूर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण जागेवर अत्याधुनिक सोयीने युक्त असे शयनकक्षासह भोजनाचा मंडप उभारण्यात आला आहे.

खासदार राहूल गांधी हे सोमवारी देगलुरात मुक्कामी राहणार आहेत. यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार नांदेडमध्ये सहभागी होणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेधा पाटकर यांनीही यात्रेत सहभागाची सहमती दर्शवली आहे. कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांचाही यात्रेत सहभाग असेल.

यात्रेचे महाराष्‍ट्रात देगलूरला ता. सात नोव्हेंबरला सायंकाळी आगमन होईल. नांदेड जिल्ह्यात देगलूर, शंकरनगर रामतीर्थ, वझरगा फाटा आणि पिंपळगाव महादेव असे चार मुक्काम असतील. दरम्यान भोपाळा येथे ता. आठ आणि कृष्णूर एमआयडीसीला ता. नऊ रोजी कॉर्नर मिटिंग असेल. ता. दहा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता नांदेड शहरातील देगलूर नाक्यावरून पदयात्रा प्रारंभ होईल. सायंकाळी पाचच्या सुमारास नवा मोंढा मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. पुढे ही यात्रा हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून जात मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in