काॅंग्रेस म्हणजे बीएसएनएलचे टाॅवर, कोणी कुठेही गेले तरी तारा जुळलेल्याच

(Congress) काँग्रेस कधीच संपली नाही, बोलणारे संपले, (Mla Dhiraj Deshmukh) पण काँग्रेस कधीही संपणार नाही.
काॅंग्रेस म्हणजे बीएसएनएलचे टाॅवर, कोणी कुठेही गेले तरी तारा जुळलेल्याच
Mla Dhiraj DeshmukhSarkarnama

उदगीर : अनेकांनी काँग्रेस संपवण्याची भाषा केली, पण काँग्रेस कधीच संपली नाही, बोलणारे संपले, पण काँग्रेस कधीही संपणार नाही. काँग्रेस म्हणजे बीएसएनएलचे टाॅवर आहे. काही जण नेटवर्क मिळत नाही म्हणून सिम बदलत राहतात, परंतु त्यांच्या तारा बीएसएनएललाच कनेक्ट आहेत, अशी मिश्किल टप्पणी काॅंग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केली.

आम्ही कुणाचा काटा काढायल येत नाही, तर .पक्षादेश जो आहे, त्याचे पालन करतो, असे म्हणत त्यांनी स्वबळाचे समर्थनही केले. कार्यकर्ता संवाद बैठकीत देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी सरकार हे राज्याचं हित लक्षात घेऊन सोनिया गांधी यांच्या परवानगीने कॉमन मिनीमाम प्रोग्रामनुसार स्थापन झालं आहे.

जबादारीने सामान्य लोंकाचे काम करत आहोत. येणाऱ्या काळातील निवडणुका पक्ष आदेशाप्रमाणे काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्व ताकदीने, निष्ठेने लढवायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी न डगमगता उदगीर पालिकेवर एकहाती काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील देशमुख यांनी यावेळी केले.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा काटा काढण्यासाठीच ते उदगीरमध्ये आले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. हा धागा पकडत `आम्ही कुणाचा काटा काढायला येत नसतो, पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतो`, असे म्हणत धीरज देशमुख यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला.

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जे ठरवेल तेच उदगीर मध्ये होईल. समाजात उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. मंदिराच्या कळसाला नमस्कार करण्यात येतो. पण खालाचा पाया सरकल्यावर कळस कुठंही दिसणार नाही. त्यामुळे निश्चय करून निडरपणे तयार रहा. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उदगीरमध्येच राहणार आहे.

Mla Dhiraj Deshmukh
राज्याने पीक विम्याचा हिस्सा न भरल्याने कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारला

या मतदारसंघात काँग्रेस पक्षची ताकद वाढवायची आहे ,हा पक्षाचा आदेश आहे. पण अन्याय कधीही सहन करणार नाही. आमचं सरळ असून हाथी सारखी चाल सुरू आहे. पण समोरचा वाकडं चालत असेल तर त्याला धोबीपछाड केल्याशिवाय सोडू नका, असे आवाहनही त्यांनी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना केले.

Related Stories

No stories found.