Chandrakant Khaire News : केंद्राचे अभिनंदन, पण `छत्रपती संभाजीनगर`चे श्रेय बाळासाहेबांचेच..

Marathwada : नामांतराची संधी केंद्राला मिळाली तीच बाळासाहेबांमुळे आणि त्यांच्या शिवसेनेमुळे
Chandrakant Khaire On Sambhajinagar News
Chandrakant Khaire On Sambhajinagar NewsSarkarnama

Shivsena : औरंगाबादचे `छत्रपती संभाजीनगर` आणि उस्मानाबादचे `धाराशीव`, असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला अखेर केंद्राने मंजुरी दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी `करून दाखवलं` असे ट्विट करत ठाकरे गटाला डिवचले. यावर नामांतरावर शिक्कामोर्तब केले, त्याबद्दल केंद्राचे अभिनंदन पण `छत्रपती संभाजीगर`, चे श्रेय हे हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे आणि त्यांच्या शिवसेनेचेच असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Chandrakant Khaire On Sambhajinagar News
Abdul Sattar News : सत्तार आता तरी `संभाजीनगर` म्हणणार का ?

फडणवीस यांनी संपुर्ण जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे आणि मग करुन दाखवले असे म्हणावे, असा टोला देखील लगावला. (Chandrakant Khaire) या नामांतराचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकारचे नाही हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली. (Shivsena) आता यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

भाजपने करुन दाखवलं म्हणत श्रेय घेतले आहे. तर ठाकरे गटाने मात्र नामांतराचा विषय आम्हीच मार्गी लावल्याचा दावा केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या आधी घेण्यात आलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, व उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा ठराव घेवून त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्राकडे हा प्रश्न प्रलंबित होता.

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सुधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि सात महिन्यात त्याला मंजुरी देखील मिळाली. यावर प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, मे १९८८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत कशाला पाहिजे त्या औरंग्याचे नाव असे म्हणत या शहराला सर्वप्रथम संभाजीनगर हे नाव दिले होते.

१९९५ च्या युती सरकारने त्यावर शिक्कामोर्तब देखील केले. परंतु पुढे न्यायालयीन प्रकरणांमध्ये ते अडकले होते. नंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते, तेव्हा त्यांनी पुन्हा संभाजनगरचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यामुळे आता जे कुणी करुन दाखवलं म्हणत आहेत, त्यांचा या नामांतर करण्यात काहीच वाटा नाही.

उलट ते मुख्यमंत्री असतांना अनेकदा त्यांना पत्र व्यवहार आणि प्रत्यक्ष भेटून देखील त्यांनी हा विषय लटकवत ठेवला होता, असा आरोप खैरे यांनी फडणवीसांवर केला. त्यामुळे केंद्राने प्रस्तावाला मंजुरी दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण या नामांतराची संधी केंद्राला मिळाली तीच बाळासाहेबांमुळे आणि त्यांच्या शिवसेनेमुळे असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com