तक्रार आणि तक्रारदाराची दखल घेण्याची गरज नाही..

या व्यक्तीने माझ्याविरोधात अनेकदा तक्रारी दिल्या, पण त्यात तथ्य आढळून आलेले नाही. भाजपशी त्याचा संबंध आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेण्याची गरज नाही. (Abdul Sattar)
तक्रार आणि तक्रारदाराची दखल घेण्याची गरज नाही..
Abdul Sattar-Mahesh ShankarpalliSarkarnama

औरंगाबाद ः शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत तब्बल २२ प्रकरणांत साडेसातशेहून अधिक कागदोपत्री पुराव्यासह ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Abdul Sattar) सत्तार यांच्याच मतदारसंघातील महेश शंकरपल्ली नावाच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. (Shivsena)

यावर अब्दुल सत्तार यांनी मात्र माझ्या विरोधात करण्यात आलेली तक्रार आणि तक्रारदाराची दखल घेण्याची गरज नसल्याचे म्हणत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. (ED) संबंधित तक्रारदार हा भाजपशी संबंधित असल्याचा दावा देखील सत्तार यांनी केला आहे. (Marathwada)

अब्दुल सत्तार यांनी बेनामी संपत्ती जमवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आणि त्या संदर्भातील तक्रार महेश शंकरपल्ली यांनी ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथे जाऊन ईडी कार्यालयात दिली होती. आरोप करण्यात आलेल्या २२ प्रकरणांतील कागदोपत्री पुरावे देखील आपण ईडीला दिल्याचा तक्रारदारांचा दावा आहे.

सत्तार मंत्री असल्यामुळेच त्यांच्या विरोधातील तक्रारींवर कारवाई करण्यात आली नाही. सहा प्रकरणांमध्ये चौकशी समिती नेमण्यात आली, पण जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने त्यावर पुढे काहीच केले नाही, असा आरोप देखील संबंधित व्यक्तीने केला आहे. ईडीकडे करण्यात आलेली तक्रार आणि आरोपांवर अब्दुल सत्तार यांनी मात्र थोडक्यात प्रतिक्रिया देत तक्रार देणारे शंकरपल्ली हे भाजपचे दलाल असल्याचा आरोप केला आहे.

Abdul Sattar-Mahesh Shankarpalli
अब्दुल सत्तार यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा ? माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली तक्रार..

सत्तार म्हणाले, या व्यक्तीने माझ्याविरोधात अनेकदा तक्रारी दिल्या, पण त्यात तथ्य आढळून आलेले नाही. भाजपशी त्याचा संबंध आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेण्याची गरज नाही. आधी केलेल्या तक्रारीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ही तक्रार आणि तक्रारदार व्यक्ती देखील दखल घेण्यासारखी नाही, अशा शब्दात सत्तार यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.