Bjp District President News : भाजप जिल्हाध्यक्षपदी समर्थकाची वर्णी लावण्यासाठी दोन मंत्र्यांमध्ये स्पर्धा ?

Chhatrapati Sambhajinagar : प्रदेश सरचिटणीस श्रीधर सावरकर यांनी दोन दिवसापुर्वी भाजपच्या ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Bjp District President News
Bjp District President News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : भाजपच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीनंतर आता शहर व जिल्हा कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांची नुकतीच शहराध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे ती वगळता ग्रामीण जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकारणीसाठी जोरदार लाॅबिंग सुरू झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी डोळ्यासमोर ठेवत आपला माणूस जिल्हाध्यक्षपदी असावा यासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे.

Bjp District President News
Dharashiv Bjp News : नवा जिल्हाध्यक्ष राणा पाटलांच्या मर्जीतला, की ठाकूर गटाचा ?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve) अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) हे प्रयत्नशील आहेत. विद्यामान जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी दानवे आग्रही आहेत. तर दुसरीकडे डॉ.कराड हे संजय खंबायते व इतरासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. विद्यामान जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे.

त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्षपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बाधले आहे. असे असले तरी भाजपतर्फे नेमण्यात आलेली एक समिती अभ्यास करून अध्यक्षपदासाठीचे नाव वरिष्ठांना कळवणार आहेत. (Bjp) जिल्हाध्यक्ष पदासाठी संजय खंबायते, प्रदीप आबा पाटील, माजी सरचिटणीस असलेले इद्रिस मुलतानी यांच्यासह माजी अध्यक्ष एकनाथ जाधव हे इच्छुक आहेत.

आता जिल्ह्यातील मंत्री आणि वरिष्ठांचा आशिर्वादा कोणाला मिळतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अकोला येथील आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीधर सावरकर यांनी दोन दिवसापुर्वी भाजपच्या ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचे मुल्यामापन केले. यात अध्यक्षपदासाठी इच्छुका असलेल्यांशीही त्यांनी संवाद साधला.

या बैठकीला विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय औताडे मात्र गैरहजर होते. याच बैठकीत सावरकर यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष औताडे यांच्या कामाचीही माहिती जाणून घेतली. आता ते आपला अहवाल वरिष्ठांना पाठवतील. रावसाहेब दानवे यांच्या शिफारशीवरूनच विजय औताडे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अनेकजण नाराज झाले होते. औताडे यांनी कार्यकाळ पुर्ण केल्याने आता पुन्हा संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सरू केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com