Chikhlikar : दहा कोटींच्या खंडणीसाठी मलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते..

सध्या बियाणी यांच्या हत्येमुळे आधाीच जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे, त्यात जर माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीलाही धमकी येते असे समजले तर लोक आणखी घाबरतील म्हणून मी शांत होतो. (Nanded)
Mp Pratap Patil Chikhlikar
Mp Pratap Patil ChikhlikarSarkarnama

नांदेड : शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची हत्या करणारे हल्लोखोर अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. (Nanded) यावरून पोलिसांवर टीका होत आहे, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. असे असतांना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

सात महिन्यांपुर्वी कुख्यात गुंड रिंदा याच्याकडून १० कोटींच्या खंडणीसाठी आपल्याला धमकीचे पत्र आले होते, असा दावा करत चिखलीकर यांनी ते पत्रच प्रसार माध्यमांना दाखवले. (Marathwada) दहा दिवसांत पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी देखील या पत्रात देण्यात आली होती. चिखलीकरांच्या या दाव्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आयजी, पोलिस अधिक्षकांना या संदर्भात आपण पत्रही दिले होते, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असा आरोप देखील चिखलीकर यांनी केला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि अवैध धंद्या संदर्भात चिखलीकर यांनी पोलिसांवर टीका केली.

प्रसार माध्यमांशी बोलतांना चिखलीकर म्हणाले, बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर व्यापारी, उद्योजकांमध्ये कमालीची दहशत आहे. बियाणी यांची हत्या करणाऱ्यांचा शोध अद्याप पोलीस लावू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे.

सर्वसामान्य, व्यापारी, उद्योजकच नाही, तर माझ्या सारखा लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित राहिलेला नाही. सात महिन्यापुर्वी रिंदा नावाच्या गुंडाकडून मला १० कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले होते. दहा दिवसांत खंडणी दिली नाही, तर तुम्हाला जीवे मारू, अशा इशारा या पत्रात देण्यात आला होता. या संदर्भात मी आयजी, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना पत्र देखील पाठवले होते.

Mp Pratap Patil Chikhlikar
Nanded : खासदार चिखलीकर म्हणतात, नांदेडात मटका, जुगार जोरात..

पण आमच्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कुठलीच चौकशी केली नाही. त्यामुळे मी देखील या विषयाची वाच्यता करायची नाही, असे ठरवून टाकले होते. सध्या बियाणी यांच्या हत्येमुळे आधाीच जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे, त्यात जर माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीलाही धमकी येते असे समजले तर लोक आणखी घाबरतील म्हणून मी शांत होतो. तक्रार करून देखील माझ्या सारख्या लोकप्रतिनिधीला सुरक्षा नाही, की या धमकी पत्राची चौकशी देखील झाली नाही, असा आरोप देखील चिखलीकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com