Chikhlikar : `भारत जोडो`त हिरारीने सहभाग घेतला तरी अशोक चव्हाण भाजपमध्ये येवू शकतात..

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यास कार्यकर्ता म्हणून आपण त्यांचे स्वागत करायला तयार आहोत, असे आपण जाहीर केले होते. तेव्हापासून आतापर्यंत माझ्या विधानाचे त्यांनी खंडण केलेले नाही. (Pratap Patil Chikhlikar)
Mp.Pratap Patil Chikhlikar- Ashok Chavan News, Aurangabad
Mp.Pratap Patil Chikhlikar- Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीयेत. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातले स्वागत, नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्था ठेवत चव्हाण यांनी हिरारीने घेतलेला सहभाग हा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते अजूनही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी `सरकारनामा`शी बोलतांना केला.

Mp.Pratap Patil Chikhlikar- Ashok Chavan News, Aurangabad
Marathwada : नांदेडातील `भारत जोडो` ने अशोक चव्हाणांचे वजन वाढले..

भारत जोडोचे नियोजन करत राहुल गांधींवर प्रभाव पाडण्यात जसे चव्हाण यशस्वी ठरले, तसेत त्यांनी यातून मी भाजप किती वाढवू शकतो हे दाखवण्याचा देखील प्रयत्न केल्याचा दावाही चिखलीकर यांनी केला. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणा एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar)अशोक चव्हाण (Ashok Chavan) ओळखले जातात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येणार, मी कार्यकर्ता म्हणून त्यांचे स्वागत करायला तयार आहे, असे पत्रकार परिषद घेऊन चिखलीकर यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून होत असतात.

नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येवून गेली. पाच दिवस, चार रात्र मुक्काम असलेल्या या यात्रेची संपुर्ण तयारी, व्यवस्था अशोक चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राहुल गांधी यांच्यासह काॅंग्रेसचे नेते त्यांच्यावर कमालीचे खूष असल्याचे बोलले जाते. असे असतांना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखीलकर यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण भाजपमध्ये येवू शकतात असे सांगायला लागले आहेत.

`सरकारनामा` प्रतिनिधीशी बोलतांना चिखलीकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकामंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना जिल्ह्यातील एकही रस्ता दुरूस्त करता आला नाही. पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने शिवसेना-भाजप सरकारने जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त केले. काॅंग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे उरलीसुरली काॅंग्रेस वाचवण्याचा प्रयत्न आहे. ज्या जिल्ह्यात काॅंग्रेसचा प्रभाव आहे, त्याच जिल्ह्यातून ही यात्रा नेली जात आहे. त्यामुळे भारत जोडण्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे.

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यास कार्यकर्ता म्हणून आपण त्यांचे स्वागत करायला तयार आहोत, असे आपण मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. तेव्हापासून आतापर्यंत चव्हाण यांनी माझ्या विधानाचे खंडण केलेले नाही. भारत जोडो यात्रेत त्यांनी हिरारीने सहभाग घेतला हे जरी खरे असले तरी त्यांनी या निमित्ताने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Mp.Pratap Patil Chikhlikar- Ashok Chavan News, Aurangabad
बहीण-भावांची पुन्हा जुगलबंदी : पकंजांनी दिला कोरा चेक; धनुभाऊ म्हणतात बाऊन्स होऊ देणार नाही

एकीकडे राहुल गांधी यांच्यावर प्रभाव पाडण्यात ते यशस्वी झाले आहेत, तर दुसरीकडे भाजप नेतृत्वाला देखील मी काॅंग्रेससाठी एवढ करू शकतो तर भाजप किती वाढवेल, हे दाखवण्यात चव्हाण यशस्वी झाल्याचा दावा चिखलीकरांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण अजूनही भाजपमध्ये येवू शकतात, या विधानावर चिखलीकर ठाम असल्याचे दिसून आले. यावर अशोक चव्हाण काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com