‘भूमरेसाहेब लयं मोठं मंत्री बनले आहेत; तीनशे रुपये तरी द्यायला लावा’ : ऑडिओ क्लिपने खळबळ

मंत्री संदिपान भूमरे आणि त्यांच्या मुलाने ऑडिओ क्लिसंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Audio clip
Audio clipSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची आज (ता. १२ सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठणमध्ये सभा होत आहे. मंत्री संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघात मागच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मागील खुर्च्या रिकाम्या होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी भूमरे यांच्याकडून काळजी घेण्यात येत आहे, त्यातूनच पैसे देऊन गर्दी जमवली जात आहे, असा आरोप शिवसेनेकडून (shivsena) होत आहे. त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे. त्याची चर्चा राज्यभरात होत आहे. (Chief Minister Eknath Shinde's meeting in Paithan paid crowd; Audio clip viral)

मंत्री संदिपान भूमरे आणि त्यांच्या मुलाने ऑडिओ क्लिसंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे विरोधकांकडून रचलले कुभांड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

Audio clip
मोठी बातमी : महापालिका, झेडपी, पंचायत समितींच्या प्रशासकांना मुदतवाढ; निवडणुका पुन्हा लांबणीवर

रोजगार हमी मंत्री संदिभान भूमरे यांच्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यानिमित्ताने भूमरे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन होणार हे निश्चित आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मागील कार्यक्रमात अपेक्षित गर्दी झाली नव्हती. त्यामुळे या वेळी भूमरे यांच्याकडून काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होण्यासाठी पैसे देऊन लोकांना आणले जात आहे, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.

Audio clip
Solapur University Election: युवासेना-संभाजी ब्रिगेडची ‘सुटा’शी हातमिळवणी; शिंदे गटाचे अस्तित्व दिसेना

या ऑडिओ क्लिपमध्ये एकजण बोलतो आहे की, ‘लेडीज म्हणत आहेत की, तीनशे रुपये हजेरी पाहिजे. भूमरेसाहेब लय मोठं मंत्री बनले आहेत. त्यामुळे तीनशे रुपये तरी द्यायला लावा म्हणे.’ त्यावर दुसरा म्हणत आहे की, ‘भाऊ आपल्या हातात काही नाही. आपण ते मुद्दाम आपल्याकडे पैसे ठेवले नाहीत. पैसे त्यांच्या हातातच ठेविले आहेत.’ त्यावर पहिला म्हणतो की, ‘पैसे तू देणार की ते. तिथं गेल्यानंतर...’ दुसरा म्हणतो आहे की, ‘हे बघ त्यांनी अडीच लाख रुपये पाठविले होते. पण मी म्हटलं की अर्धे खाले आणि अर्धे ठेवले असा विषय होतो. दहा वीस हजारांसाठी आपलं रिलेशन खराब होतं. भूमरेसाहेबांच्या मुलाच्या मेहुण्याकडेच पैसे ठेवले आहेत. ते स्वतःच देणार आहेत. डायरेक्ट अडीचशे अडीचशे रुपये देण्याचं आपलं ठरलं.’ पहिला म्हणतो,‘पैठणला जाण्यासाठी तीनशे तीनशे रुपये द्या. तशी महिलांच्या लीडरचं म्हणणं आहे. त्यावर दुसरा म्हणतो की आपण काहीतरी ॲडजेस्टमेंट करू’ (सरकारनामा या ऑडिओची कोणतीही पुष्टी करत नाही)

मंत्रिमहोदय खोके रिकामे करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून मंत्री संदिपान भूमरे यांच्यावर करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com