कसं काय पाटील बंर हाय का, दिल्लीत घडलं ते खरं हाय का : मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना चिमटा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोले
Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
Jayant Patil-Cm Eknath Shinde News MumbaiSarkarnama

मुंबई : दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलायला उठले. तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) उठून गेले होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पैठमध्ये होते. या सभेमध्ये बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी चांगलीच फटकेबाजी केली. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांना टोले लगावले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जयंत पाटील मोठ्या प्रमाणात टीका करतात.

Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
मुख्यमंत्री शिंदेंनी 'पेढे तुला' नाकारली अन् सभेतील गर्दी तुटून पडली...

पाटील यांना टोला लगावताना शिंदे म्हणाले, मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. त्यामध्ये एक गाने खुप गाजले होते. कसं काय पाटील बंर हाय का, दिल्लीत घडलं ते खरं हाय का, असा चिमटा त्यांनी काढला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिवेशनात व्यासपिठावर जयंत पाटील यांचे भाषण आधी सुरु झाले. त्यांचे भाषण सुरु होताच अजित पवार उठून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, यावरुन शिंदे यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
'शिरूर'मध्ये विकास दिसेल; केंद्रीय मंत्री रेणुकासिंहच्या दौऱ्याचे कोल्हेंनी केले स्वागत

दरम्यान, या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. ''मी नाराज नाही आणि मला बोलण्यापासूनही कोणी अडवले नव्हते. राज्यपातळीवर काही सभा, अधिवेशन असेल तर मी बोलतो. मात्र, राष्ट्रीय पातळीवर बोलत नाही. मीच नाही तर वेळे अभावी तिथे आलेले अनेक जण बोलू शकले नाहीत. असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in