Farmers Letter to Governor : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वगुण संपन्न, तरी शेतकरी आत्महत्या का ? राज्यपालांना रक्ताने लिहले पत्र..

Marathwada : मला आमदार करा, मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवतो आणि खऱ्या अर्थाने देश कृषीप्रधान बनवतो
Farmers Letter to Governor, News
Farmers Letter to Governor, NewsSarkarnama

Beed : शेतकऱ्यांच्या राज्यातील वाढत्या आत्महत्या आणि त्याकडे सत्ताधाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष यातून उद्विग्न झालेल्या एका शेतकरी (Farmer) पुत्राने थेट आपल्या रक्ताने राज्यपालांना पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वगुण संपन्न आहेत, मग तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? असा सवाल या शेतकरी पुत्राने पत्रातून केला आहे. राज्यपालांना स्वतःच्या रक्ताने लिहलेले पत्र पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Farmers Letter to Governor, News
Aamir Khan On Mann Ki Baat : 'मन की बात'मध्ये येणार 'परफेक्शनिस्ट' खान; पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक..

बीड (Beed News) जिल्ह्यातील केज तालुक्याच्या दहिफळ बडमाऊली येथील हा तरुण शेतकरी आहे. श्रीकांत विष्णू गदळे असे त्याने नाव असून राज्यात व जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे तो दुःखी आहे. (Governor) एका उद्विग्नतेतून गदळे याने हे पत्र लिहले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा लिहून पत्रातील शाई संपली, लोकशाही असलेल्या जगात शेतकऱ्याच्या पत्राला किंमत राहिली नाही.

त्यामुळे मी किसान पूत्र माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित आहे. (Marathwada) त्याला तरी लोकशाहीत किमंत आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री सर्वगुण संपन्न आहेत, मग तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? राज्यपाल बदलले, नवे आले, पण जुने प्रश्न नव्या राज्यपालांना सोडवता येतील का? आम्हाला अनुदानाची भीक नको, शेतमालाला योग्य भाव द्या.

मला आमदार करा, मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवतो आणि खऱ्या अर्थाने देश कृषीप्रधान बनवतो, असे देखील गदळे याने आपल्या पत्रात नमूद केले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र राज्यापाल रमेश बैस यांना पाठवण्यात आले आहे. या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com