अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?
Minister Raosaheb Danve-Cm ThackeraySarkarnama

अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?

(Central Railway State Minister)या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल.(By-election)

देगलूर ः गेल्या दोन ते अडीच वर्षापासून राज्याचा काय विकास झाला, त्या प्रमाणात केंद्राने काय विकास केला हे तुम्ही मतदार म्हणून कधी तपासणार आहात? मुख्यमंत्री ना मंत्रालयात वेळेवर येतात, ना वर्षावर वेळेवर पोहोचतात. तर ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर कधी पोहोचणार? असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेत बदल होणार आहे की नाही? हे मला माहीत नसले, तरी या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल, असा दावाही त्यांनी केला. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भगवंत खुबा, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, डॉ. तुषार राठोड, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

दानवे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून नांदेडची केंद्रात व राज्यात सत्ता होती तरीही तुम्ही नांदेड - देगलूर - बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडू शकणार नाहीत. खरे तर , हे मतदारांचे दुर्दैव म्हणावे लागेल. रेल्वे मार्ग संबंधात केंद्र व राज्याने अर्धा अर्धा वाटा उचलायला पाहिजे. कर्नाटक सरकारने तो वाटा उचललेला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्र सरकारने नांदेड - बिदर रेल्वेमार्ग संदर्भातील आपला वाटा उचललेला नाही. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो, की या निवडणुकीनंतर हे काम मार्गी लावून त्याच्या उद्‍घाटनाला मी स्वतः येईन, असा शब्द दानवे यांनी दिला.

तीनवेळा अतिवृष्टी होऊन देखील तात्काळ मदत मिळायला तयार नाही. यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणेच राहिलेले नाही, हे सुटाबुटातले सरकार आहे. कारखाने, जमिनी, कंपन्या उभारल्या नसत्या तर तुमच्यावर धाडी कशाला पडल्या असत्या? असा टोला देखील दानवे यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला. कष्टाने कमावलेली असेल व ते सत्य असेल तर या धाडसत्राची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Minister Raosaheb Danve-Cm Thackeray
वसुली असेल तेव्हा सरकारचा `ससा`, अन् शेतकऱ्यांना मदत देतांना `कासव`, होतो

शिवसेनेचे १२ आमदार संपर्कात -लोणीकर

ही निवडणूक होऊ द्या, मग राज्यात सत्तांतर झालेले तुम्हाला दिसेल, असा दावा करतांनाच माजी मंत्री तथा निवडणुकीचे प्रमुख आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेचे बारा आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाषणात सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in