Chhatrapati Sambhajingagr APMC : बहुमत मिळाल्यावरही धाकधूक, १४ संचालकांना बागडेंनी पाठवले गुजरातला..
Marathwada : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये भाजप (Bjp) आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिंदे गटाच्या युतीने बहुमत मिळवले. १८ पैकी ११ जागा जिंकल्या, पण सभापती, उपसभापती पदासाठी पक्षात जोरदार स्पर्धा सुरू झाल्यामुळे बागडेंची दमछाक होतांना पहायला मिळते आहे.
हमाल, मापाडी, व्यापारी मतदारसंघातील तीन सदस्यांनी देखील युतीलाच पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हा कुठलीही जोखीम नको म्हणून बागडे (Haribhau Bagde) यांनी १४ संचालकांना थेट गुजरात सहलीवर पाठवले आहे. (Bjp) राज्यातील सत्तांतराआधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील उठाव केलेल्या ५० हून अधिक आमदारांना देखील एकत्रित व सुखरूप राहण्यासाठी गुजतराला नेण्यात आले होते.
आता आमदार बागडे यांनी सभापती, उपसभापी पदाच्या निवडणुकीत दगा फटका होवू नये याची काळजी घेत १४ संचालकांना थेट गुजरातवारीवर पाठवले आहे. (Marathwada) श्रीराम शेळके यांच्यावर बागडे यांनी सर्वांची जबाबदारी सोपवली असून रोज त्यांच्याकडून माहिती दिली जात असल्याचे बोलले जाते.
हे सगळ्या संचालक २२ मे रोजी सकाळीच थेट मतदानाला येणार आहेत. बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने बरेच प्रयत्न आणि तडजोडी केल्या होत्या. त्यामुळे हातात आलेली सत्ता कुठल्याही परिस्थितीत निसटता कामा नये, अंतर्गत नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होवू नये, यासाठी बागडे यांनी युतीचे ११ आणि पाठिंबा दिलेले तीन अशा १४ जणांना दोन दिवसापुर्वीच गुजरात दौऱ्यावर पाठवले. सध्या हे संचालक स्टॅट्यू आॅफ युनिटी, द्वारकाधामसह गुजरात मधील विविध पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.