Dr.Bhagwat Karad On Water issue : छत्रपती संभाजीनगरवासियांना डिसेंबर २०२४ अखेर मुबलक पाणी मिळणार..

Bjp : महापालिका, लोकसभा व शहरातील विधानसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न सगळ्याच पक्षांसाठी `गले की हड्डी`, बनणार आहे.
Dr.Bhagwat Karad On Water issue
Dr.Bhagwat Karad On Water issueSarkarnama

Maratwhada : `धरण उशाला अन् कोरड घशाला`, ही म्हण छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी तंतोतंत खरी ठरत आहे. (Dr.Bhagwat Karad On Water issue) परंतु तरी देखील राजकीय पक्षांकडून येत्या डिसेंबर २०२४ पर्यंत नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल अशी आश्वासने दिली जात आहेत. तापर्यंत राज्यात व केंद्रात सगळ्याच प्रमुख पक्षांची सत्ता आली, गेली पण राज्य, केंद्राने काही शहरवासियांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. दहा-बारा दिवसानंतर येथील नागरिकांना पाणी मिळते, त्यामुळे महापालिकेवर २५-३० वर्ष सत्ता उपभोगलेल्या पक्षांसोबतच जिल्ह्यातील नेते, मंत्री, पुढारी यांचे हे अपयशच म्हणावे लागेल.

Dr.Bhagwat Karad On Water issue
Sanjay Shirsat on Sanjay Raut News : राऊतांनी जे तिकडे आहेत त्यांची काळजी करावी, त्यांना सांभाळावे..

परंतु `देर आये दुरुस्त आहे`, प्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून जायकवाडी धरण ते छत्रपती संभाजीनगर शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. २०१४ च्या युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (bjp) यांनी शहरासाठी १६८० कोटींची योजना मंजुर केली होती.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले, पण कोरोनामुळे ही योजना पुढे सरकलीच नाही. (Dr.Bhagwat Karad) आता पुन्हा भाजप आणि शिंदे यांचे सरकार सत्तेवर आहे, त्यांनी केंद्राच्या माध्यमातून या पाणी योजनेला वेग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. (Aurangabad Municipal Corporation) परंतु तरी देखील योजनेच्या कामाला म्हणावा तसा वेग नाहीये. त्यामुळे शहवासियांना मुबलक पाण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन वर्ष वाट पहावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे.

परंतु तरी देखील राजकीय पक्षांकडून येत्या डिसेंबर २०२४ पर्यंत नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल अशी आश्वासने दिली जात आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड सातत्याने या योजनेचा आढावा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. योजनेला गती मिळावी यासाठी त्यांनी वारंवार बैठका घेवून सूचना दिल्या, कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर आता कुठे जायकवाडी धरणातील जॅकवेल, नक्षत्रवाडी येथील पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. डाॅ. कराड यांनी नुकतीच या कामाची संबंधित अधिकाऱ्यांसोबत जावून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आता शहरवासियांना पाण्यासाठी डिसेंबर २०२४ चा नवा मुहूर्त कराड यांनी सांगितला आहे. आगामी महापालिका व त्यानंतर होणाऱ्या लोकसभा व शहरातील विधानसभा निवडणुकीत देखील पाण्याचा प्रश्न सगळ्याच पक्षांसाठी `गले की हड्डी`, बनणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com