Chhatrapati Sambhajinagar News : नामांतराच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू..

Aimim : ज्या कुणाचे या शहरावर, इतिहासावर आणि नावावर प्रेम आहे, तो प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी होवू शकतो.
Protest Against Aurangabad Name Change News
Protest Against Aurangabad Name Change NewsSarkarnama

Imtiaz Jalil : खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आवाहनानूसार आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. नामांतरविरोधी कृतीसमितीच्या वतीने हे आंदोनल बेमुदत सुरू राहणार आहे. दुपारी साडेबारा वाजता खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) हे देखील या आंदोलनात सहभागी झाले.

Protest Against Aurangabad Name Change News
Dharashiv News : चाळीस वर्ष लाल दिवा दिला, त्यांना सोडून खेकडा मंत्र्यांच्या हाताखाली काम करतायेत..

लोकांच्या भावना लक्षात ने घेता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादण्यात आल्याचा पुनरुच्चार इम्तियाज यांनी केला. (Aimim) इम्तियाज जलील म्हणाले, हे आंदोलन कुण्या जाती-धर्माच्या विरोधात नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात देखील नाही. (Aurangabad) औरंगाबाद या शहराला एक इतिहास आहे, तो बदलण्याचा प्रयत्न आपल्या राजकीय स्वार्थासाठी करण्यात येत आहे. या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे.

ज्या कुणाचे या शहरावर, त्याच्या इतिहासावर आणि नावावर प्रेम आहे, तो प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी होवू शकतो. राष्ट्रवादी व काॅंग्रेसची भूमिका या नामातंराच्या बाबतीत काय आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यांचे राज्यपातळीवरचे नेते वेगळी भूमिका घेतात, तर स्थानिक नेते आमचा नामांतराला विरोध आहे हे सांगतात. पण हा विरोध करत असतांना त्यांना पक्षाने दिलेले पद मात्र सोडवत नाही.

विरोध करायचा असेल तर खुल्या मनाने करा, पदाची खुर्चीची पर्वा करू नका, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला. हे आंदोलन किती दिवस, महिने, वर्ष चालेल हे सांगत येत नाही. मी या शहराचा नागरिक आहे, माझा जन्म इथे झाला, या शहरानेच मला आमदार, खासदार केले.

त्यामुळे माझे या शहरावर प्रेम आहे, त्यामुळे कोणाच्या हुकूमशाहीमुळे माझ्या शहराचे नाव बदलले जाणार असेल तर ते मला कदापी मान्य नाही, म्हणून मी आंदोलनाची हाक दिली, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांना आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com