Chhatrapati Sambhajinagar Loksabha : शिंदे-भाजपचे ठरेना, ठाकरे गटातून खैरे की दानवे ?

२०१९ च्या निवडणुकीत खैरे यांचा केवळ पाच हजार मतांनी पराभव झाला होता.
opposition Leader Ambadas Danve-Chandrakant Khiare News
opposition Leader Ambadas Danve-Chandrakant Khiare News Sarkarnama

Marathwada : लोकसभा निवडणुका वर्षभराने होणार असल्या तरी त्यासाठीच्या उमेदवारांची चाचपणी आणि चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. Chhatrapati Sambhajinagar Loksabha) महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यात राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडानंतर काय परिस्थिती असेल याबद्दल अनेक तर्क लढवले जात आहेत. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोण मैदानात असेल याची देखील चर्चा आणि खल सुरू आहे.

opposition Leader Ambadas Danve-Chandrakant Khiare News
Kannad Political News : कन्नडमधून पाटील की जाधव ? सत्तार कोणाला बळ देणार?

शिंदेंची शिवसेना-भाजपसोबत राज्यात सत्तेत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा कोण लढवणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने पुर्वी जिंकलेल्या सगळ्याच जांगावर दावा सांगितला आहे. संभाजीनगरची जागा २०१९ मध्ये शिवसेनेच्या हातून अगदी कमी मतांनी गेली होती. (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे यांचा केवळ पाच हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून पुन्हा त्यांना संधी दिली जाणार असे बोलले जाते.

तर दुसरीकडे मराठा उमेदवार द्या, अशी देखील मागणी पक्षाकडे केली जात असून याचा विचार झाला तर मग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव देखील पुढे येवू शकते अशी परिस्थिती आहे. (Shivsena) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक मराठा लाख मराठाचा प्रभाव होता, त्यामुळेच अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना तब्बल २ लाख ८३ हजार मते मिळाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाल्यामुळेच खैरे यांचा पराभव होवून एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) विजयी झाले होते.

परंतु विजय आणि पराभवातील अंतर पाहता खैरे यांनी चांगली लढत दिल्याचे त्यावेळी दिसून आले होते. मात्र निवडणुकीत किती मंतांनी विजय किंवा पराजय झाला याला फारसे महत्व नसते. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती, शिवसेनेत पडलेली फूट पाहता चंद्रकांत खैर यांना सहानुभूतीच्या लाटेचा आणि वैयक्तिक जनसंपर्काचा फायदा होईल, असे सांगितले जाते. चार टर्म खासदार राहिल्यामुळे त्यांची स्वतःची अशी वोट बॅक आहे, शिवाय ठाकरे आणि गेल्यावेळी निसटता पराभव यांची सहानुभूती खैरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे खैरे यांना पुन्हा एकदा संधी देण्याचीच दाट शक्यता आहे. तिकडे भाजप-शिंदे सेनेपैकी ही जागा कोण लढवणार? यावर लढत कशी होणार हे अंवलबून असेल. तर एमआयएमच्या इम्तियाज जलील पुन्हा एकदा मत विभाजनाचा फायदा होईल या आशेवर आहेत. शिंदे गटासोबत गेलेल्या खासदारांपैकी एकही पुन्हा निवडून येणार नाही, असा भाजपने केलेला अंतर्गत सर्वे सांगतो, असा दावा करत खैरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com