Chhatrapati Sambhajinagar APMC : भाजपने अकरा जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला रोखले..

Bjp : १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवत भाजप-शिंदे युतीने बाजी मारल्याचे चित्र आहे.
Chhatrapati Smabhajinagar Market Committee News
Chhatrapati Smabhajinagar Market Committee NewsSarkarnama

Marathwada : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या (Chhatrapati Sambhajinagar APMC) निवडणुकीत भाजप-शिंदे युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या राजकारणानंतर या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने १८ पैकी ११ जागा जिंकत महाविकास आघाडीला रोखले आहे.

Chhatrapati Smabhajinagar Market Committee News
Latur APMC Election : लातूर बाजार समितीत देशमुखांचाच आवाज, भाजपला एन्ट्री नाहीच..

जाहीर झालेल्या १५ पैकी ११ जागांवर भाजपच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चार जागांवर समाधान मानावे लागले. तीन जागाचा निकाल अजून हाती यायचा आहे. (Bjp) भाजपचे वादग्रस्त ठरलेले आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ते राधाकिशन पठाडे विजयी झाले आहेत.

तर ज्यांच्या उमेदवारीवर पठाडे यांनी व्यापारी असल्याचे सांगत आक्षेप घेतला होता, ते काॅंग्रेसचे जगन्नाथ काळे हे देखील विजयी झाले आहेत. (Haribhau Bagde) या बाजार समितीत महाविकास आघाडी बाजी मारणार असे बोलले जात होते. मात्र भाजपचे नेते आमदार हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे यांना महाविकास आघाडीला रोखण्यात यश आले.

१८ पैकी ११ जागांवर विजय मिळवत भाजप-शिंदे युतीने बाजी मारल्याचे चित्र आहे. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये राधाकिशन पठाडे, अभिजीत देशमुख, श्रीराम शेळके, मुरली चौधरी, भागचंद ठोंबरे, गणेश दहीहंडे, दत्ता उकिरडे, जनाबाई ठोंबरे, सुजाता गायके, पुनमचंद बामणे व भागिनाथ नवपुते यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीचे जगन्नाथ काळे, महेंद्र खोतकर, अब्दुल रहिम, कैलास उकिरडे यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com