Abdul Sattar : गाड्या फोडा हे थोरातांचे विधान तपासा, त्यांना उद्धव ठाकरेंनी सांगितले होते का?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळतो आहे, हीच खरी त्यांची पोटदुखी असल्याचा टोला सत्तारांनी लगावला. (Abdul Sattar)
Mla Abdul Sattar News Mumbai
Mla Abdul Sattar News MumbaiSarkarnama

औरंगाबाद : हिंगोलीत दोन दिवासंपुर्वी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा, असे चिथावणीखोर विधान केले होते. त्याचे पडसाद उमटले आणि काल पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाला. हा गंभीर प्रकार आहे, त्यामुळे थोरात यांनी केलेले विधान पोलिसांनी तपासावे, या चिथावणीखोर विधानामागे कोण आहे? (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी त्यांना असे आदेश दिले होते का? आणि दिले असतील तर मग त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

शिंदे गटाचे आमदार माजीमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्यानंतर (Shivsena) शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष उडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी या हल्याचा निषेध करत या हल्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी तर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच बोट दाखवले.

सत्तार म्हणाले, एखाद्याचे विचार किंवा त्याने घेतलेला निर्णय पटत नसेल तर त्याचा लोकशाही मार्गाने निषेध करणे अपेक्षित आहे. निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध लढून तुम्हाला त्यांना उत्तर देता येऊ शकते. पण रस्त्यावर उतरून असे जीवघेणे हल्ले करणे ही गंभीर बाब आहे. उद्या आमच्याकडूनही रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिले गेले तर काय होईल? त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की ही वेळ आमच्यावर आणू नका.

Mla Abdul Sattar News Mumbai
गेलात ना..आता शिंदेची तळी उचला ; आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं सहन करणार नाही..

हिंगोलीत शिवसेनेचे एक संपर्कप्रमुख शिवसैनिकांना आवाहन करतात की गद्दारांच्या गाड्या फोडा, तुमचा उद्धव ठाकरे सन्मान करतील हे योग्य आहे का? त्यामुळे थोरातांनी जे चिथावणीखोर विधान केले ते त्यांना उद्धव ठाकरे यांनी करण्यास सांगितले होते का? याचा देखील पोलिसांनी तपास केला पाहिजे. त्यात तथ्य आढळले तर मग उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कारवाई केली जावी, अशी मागणी देखील सत्तार यांनी केली.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळतो आहे, हीच खरी त्यांची पोटदुखी असल्याचा टोला सत्तारांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीतून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com