Chandrasekhar Bawankule : भाजपचे ठरले, टोपेंच्या विरोधात विधानसभेला घाडगे..

Bjp : आम्ही घाडगेंना ताकद देवू, तुम्ही त्यांना ताकद द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.
Bjp News, Jalna
Bjp News, JalnaSarkarnama

Jalna News : नागपूरच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, जालना जिल्ह्यातील साखर कारखानदार सतीश घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांच्याविरोधात त्यांना मैदानात उतरवणार की? मग परभणी लोकसभा मतदारसंघातून यावर चर्चा सुरू होत्या.

Bjp News, Jalna
Devendra Fadnvis News : मंत्रीमंडळ विस्तार करू, पण योग्यवेळ आल्यावर; इच्छूक पुन्हा गॅसवर..

परंतु मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ जालना जिल्हा दौऱ्या दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी याबद्दलची स्पष्टता केली. घाटगेंना ताकद द्या, असे आवाहन करत ते घनसावंगीतून (Bjp) भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घनसांवगीतून टोपे विरुद्ध घाटगे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. लवकरच घनसांवगीत दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेत केंद्र सरकारच्या ४९ योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. घनसावंगीत भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे, आम्ही घाडगेंना ताकद देवू, तुम्ही त्यांना ताकद द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.

समृद्धी शुगरचे चेअरमन सतिश घाडगे पाटील यांना पक्षात घेवून साखर कारखानदारी क्षेत्रासह राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. घनसावंगी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने घाडगे यांचा भाजपमध्ये प्रेवश करण्यात आला होता. परभणी लोकसभा क्षेत्रात घाडगे यांचे दोन साखर कारखाने आहेत.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समृद्धी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच घाडगे यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघात २१ पैकी १३ ठिकाणी सरपंचपद पटकावले होते. आता घाडगे यांच्या रुपाने घनसांवगीत राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांच्या विरोधात भाजपला तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. घाडग हेच भाजपचे उमेदवार असतील हे बावनकुळे यांनी स्पष्ट केल्यामुळे भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com