वड्डेटीवारांच्या टीकेने चंद्रकांतदादा भडकले; आघाडीतील नेत्यांनी डोकी तपासण्याचा सल्ला

(Bjp Leader Chandrakant Patil) ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक झाल्याचा राग किती करायचा. पण नवाब मलीक यांनी आता जणू शाहरूख खानच्या मुलाचे वकीलपत्रच घेतल्यासारखे ते वागत आहेत.
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

परभणी ः खोट बोल पण रेटून बोल असा सगळा प्रकार महाविकास आघाडी सरकार व त्यांच्या मंत्र्यांचा सूरू आहे. गडकरी यांनी फडणवीसांची जिरवली, त्यांच्यात छत्तीसचा आकडा आहे, हे काॅंग्रेचे मंत्री विजय वड्डेटीवार यांचे विधान हास्यास्पद आणि चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीही बोलायची सवयच जडली आहे. त्यामुळे या नेत्यांनी आता आपली डोकी तपासून घेतली पाहिजे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना पाटील यांनी वड्डेटीवार यांनी गडकरींचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पाटील म्हणाले, नितीन गडकरी हे आमचे नेते आहेत, आमचे पालक आहेत. ते भाजपमधील सगळ्यांवर प्रेम करतात. तेव्हा गडकरी आणि फडणवीस यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे हा जावईशोध वड्डेटीवार यांनी कुठून लावला कोण जाणे?

जिरवणे वगैरे अशी भाषा जाहीर सभेमध्ये वापरणे योग्य आहे का? पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे खोटे बोल पण रेटून बोल असे सध्या सुरू आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्यात कोणातच वाद नाही. राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्यासाठी शंभर कोटींची आॅफर दिल्याचा दावा केला आहे, या पत्रकाराच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी मोठ्याने हसत, म्हणूनच मी म्हणतो या महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकी तपासली पाहिजे असा खोचक टोला लगावला.

ड्रग्ज प्रकरणाच्या आडून एनएसबी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींना टार्गेट करत आहेत? असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या संदर्भात बोलतांना पाटील म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक झाल्याचा राग किती करायचा.

Bjp Leader Chandrakant Patil
प्रचाराच्या धावपळीतही चंद्रकांत पाटील भजनात रंगले

पण नवाब मलीक यांनी आता जणू शाहरूख खानच्या मुलाचे वकीलपत्रच घेतल्या सारखे ते वागत आहेत. भाजपचा कुठलाही पदाधिकारी या प्रकरणात नाही, फाॅरेन्सीक लॅबच्या अहवालात तसे स्पष्ट करण्यात आले आहे, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. हे सरकार जाणार आणि आपण बेरोजगार होणार या भितीने नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com