चंद्रकांत पाटलांची वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

( Ashok Chavan Said, I think it is more appropriate to talk about development than political statements) ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही आणि हा विषय राज्याच्या अखत्यारितला नाही हे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

नांदेड ःभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारने रखडवले असल्याची टीका केली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांच हे वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले आहे.

५० टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही आणि हा विषय राज्याच्या अखत्यारितला नाही हे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले असताना चंद्रकात पाटलांनी राज्य सरकारने आरक्षण रखडवल्याचा शोध कुठून लावला असा उलट सवाल अशोक चव्हाण यांनी केला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे लाड पुरवणारे असल्याची टीका केली, त्यालाही अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले.

कोण कुणाचा पुत्र, कुणाची पुत्री यात मला पडायचं नाही. राजकीय स्टेटमेंट पेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलणं मला अधिक योग्य वाटत, असा टोला देखील चव्हाण यांनी लगावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष भाजप व त्यांच्या नेत्यांचा कलगितुरा, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही केल्या थांबत नाहीयेत.

भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका केली जातेय, तर त्याला महाविकास आघाडीचे नेतेही जशास तंस उत्तर देतांना दिसतायेत. ओबीसी, मराठा आरक्षणासाठी भाजपने सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांना आधीच व्हिलन ठरवले आहे.

हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही, किंबहुना या सरकारमुळेच ते रखडले अशी, टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांनी देखील हे सरकार म्हणजे पिता, पुत, पुतण्या-पुतणीसाठी काम करत असल्याचे म्हटले होते.

Ashok Chavan
भाजपचे संकटमोचक म्हणतात, सरकार पडेल की नाही? हे सांगता येणार नाही

या दोन्ही आरोपांना अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. मराठा, ओबीसी आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दोष देणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले आहे. तर शेलार यांच्या टीकेवर उत्तर देण्यापेक्षा मला विकासावर बोलायला आवडेल, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in