`नवाब मलिक यांना काही उद्योग नाही, आर्यनखानचे वकील म्हणून रोज भांडतात..`

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत.
Chandraakant Patil & Nawab Malik
Chandraakant Patil & Nawab Malik Sarkarnama

पुणे : 'नाचता येईना अंगन वाकडे, शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्नावरून लक्ष दूर करण्यासाठी रोज नवाब मलिक रोज त्या शाहरूख खानच्या मुलाचा विषय घेऊन त्याचा वकील म्हणून भांडत आहेत. यांना दुसरा काही उद्योग नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandraakant Patil) यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर केली. पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना हे वक्तव्य केले आहे.

Chandraakant Patil & Nawab Malik
ठाकरे सरकारची राज्यात मोगलाई...चंद्रकात पाटील यांची टीका

पाटील म्हणाले, मराठवाडयात अतिवृष्टी झाली तरी, मुख्यमंत्री पाहणीसाठी आले नाही. इतके नुकसान झाले तरी पंचनामे होत आहेत. मुळात आपल्याला पंचनामे मान्यच नाहीत. इतक्या मोठ्या नुकसानीनंतर सरकारने सरसकटच मदत करायला हवी. 2019 साली आलेल्या पुरात आमच्या सरकारने पंचनामा न करता शेतकऱ्यांना क्षेत्रफळानुसार सरसकट मदत जाहीर केली होती.

आजपर्यंत राज्याला अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यांची शेतीशी नाळ होती. मात्र, जे त्यांना जमल नाही ते 2019 साली फडणवीस यांनी करून दाखवले. त्यांनी एक ऐतिहासीक जीआर काढला. आणि ज्यांमार्फत ज्या शेतकऱ्याने कर्ज काढले त्यांना पुर्ण कर्ज माफी दिली. तर, ज्यांनी कर्ज न काढता स्वत:च्या खर्चाने पेरणी केली त्यांना तीनपट मदत या माध्यामातून केली होती. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, त्यांना दिवाळीपर्यंत टोकण स्वरूपात का होईना मदत मिळावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

पाटील यांना पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला असता पाटील यांनी राज्याकडे बोट करत पेट्रोल, डिझेलचा समावेश हा जीएसटीमध्ये करावा असा सल्ला राज्य सरकारला दिला. याबरोबरच आम्ही आंदोलन केले म्हणून राज्यातील मंदिरे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरे यांनी लसीकरणासाठी दाखवलेला 6 हजार कोटीचा चेक कुठे गेला? असा सवाल करत तो चेक आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरा असा टोला लगावला.

Chandraakant Patil & Nawab Malik
एनसीबीची 90 टक्के प्रकरणं खोटी, वकील पुरावे गोळा करतायेत! नवाब मलिकांचा बॉम्ब

अजित पवारांचे सुद्धा मलिकांसारखेच झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष दुर्लक्षित करत आहे. केंद्राकडे थकीत असलेले 35 हजार कोटी जीएसटी कौन्सलकडून मिळत नाही असे अजित पवार म्हणतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे कलेक्शन नसल्याने केंद्राला नुकसान भरपाई देण्यासाठी अडचण येत आहे. यामुळे राज्यासरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज काढून मदत करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. याबरोबरच येत्या काही दिवसात शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी सुद्धा आत्महत्या करीत आहेत त्यांनाही मदत मिळावी यासाठी येत्या सात-आठ दिवसात प्रत्येक जिल्हयात आंदोलने करण्यात येतील अशी घोषणा पाटील यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com