Chandrakant Khaire : उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख, मुदत वगैरे असे काही नाही..

Aurangabad : पक्षांतर्गत निवडणूक आहे, ती पुढे ढकलली जावू शकते किंवा एक ठराव घेवून पक्षप्रमुख पदाला मुदत वाढ दिली जावू शकते.
Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray News, Aurangabad
Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama

Shivsena : शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? पक्षप्रमुख कोण राहणार? या सगळ्या प्रश्नांवर निवडणूक आयोग कालच्या सुनावणीत निर्णय देईल असे वाटत होते. परंतु आता यावरील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. दरम्यान, २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला.

Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray News, Aurangabad
Bjp : यासाठी बागडेंनी केले शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन..

यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मात्र उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदी कायम राहतील, मुदत वगैरे काही नाही, पक्षातंर्गत बैठकीत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय होवू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Shivsena) राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना तात्पुरते नवे चिन्ह आणि पक्षाला नाव देत अंधेरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पार पाडला.

परंतु निवडणुक आयोगासमोर या संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीतून अद्याप तरी कुठलाचा मार्ग निघालेला नाही. काल निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांनी युक्तीवाद केला. परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाची मुदत २३ जानेवारीला संपत असल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

या संदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख म्हणून पदावर कायम राहतील. मुदत संपली वगैरे असे काही नाही. ही पक्षांतर्गत निवडणूक आहे, ती पुढे ढकलली जावू शकते किंवा एक ठराव घेवून पक्षप्रमुख पदाला मुदत वाढ दिली जावू शकते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना ज्याप्रमाणे मुदतवाढ दिली तसाच हा प्रकार आहे.

त्यामुळे मुदत संपली आता, पक्षप्रमुख कोण? या चर्चेला काही अर्थ नाही. पक्ष पातळीवर या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मी उद्या मुंबईला जाणार आहे, वरिष्ठ पातळीवर जे ठरेल त्या प्रमाणे निर्णय घेतला जाईल. तुर्तास पक्षप्रमुख पदाच्या निवडीसाठी कुठल्याच प्रकारच्या हालचाली नाहीत, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com