Chandrakant Khaire : ठाकरे कुटुंब, शिवसेना हेच आपले पंढरपूर अन् पांडुरंग..

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांनी नेहमीच सामान्य शिवसैनिकाला मोठं केले, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्रीपदावर बसवले. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Thackeray Family News Aurangabad
Chandrakant Khaire-Thackeray Family News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आणि बालेकिल्ला म्हणून औरंगाबाद आणि मराठवाडा ओळखला जातो. अनेक संकट आपल्यावर आली, पण त्यातून आपण उभारी घेत जोमाने उभे राहिलो. आज जी परिस्थिती (Shivsena) शिवसेनेवर आली आहे, तशी यापुर्वीही आली होती. अनेकांनी पक्ष सोडला, गद्दारी केली. पण गद्दारी करणारे संपले, पक्ष मात्र जोमाने वाढत राहिला. त्यामुळे खचून जाता जोमाने कामाला लागा, कारण ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग आहेत, अशी साद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिवसैनिकांना घातली.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडून ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर ठाकरे यांनी आता राज्यभर पुन्हा नव्याने संघटना बांधणीची मोहिम हाती घेतली आहे. (Aditya Thackeray) त्याचाच भाग म्हणून बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे हे शिवसंवाद मोहिमेच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत.

या दौऱ्याच्या पुर्वी पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत खैरे म्हणाले, आपला जिल्हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला राहिला आहे. शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी झपाटलेल्या आपल्या जिल्ह्याने कायमच भगव्याची साथ दिली. २५-३० वर्षाच्या राजकीय इतिहासात शिवसेनेने ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सगळ्यांच निवडणुकांमध्ये विजय मिळवला.

Chandrakant Khaire-Thackeray Family News Aurangabad
शिंदे म्हणाले तुला आमदार करण्यासाठी खूप केले, मी म्हणालो पक्षप्रमुखांनी सांगितले म्हणून केले..

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांनी नेहमीच सामान्य शिवसैनिकाला मोठं केले, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण स्वार्थासाठी अनेकांनी गद्दारी केली. पण गद्दारांचे काय होते हे यापुर्वी देखील आपण पाहिलेले आहे. शिवसेना अधिक जोमाने आणि ताकदीने वाढतेच आहे. येणाऱ्या काळात देखील गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन देखील खैरे यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com