Chandrakant Khaire On Shirsat : शिरसाट यांना भाजपच मंत्री होवू देणार नाही, खैरेंची भविष्यवाणी...

Marathwada : राज्य सरकार सध्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणारच नाही.
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire NewsSarkarnama

Shivsena : आमदार संजय शिरसाट हे मंत्री होवू शकत नाहीत, भाजपच त्यांना मंत्री होवू देणार नाही, अशी भविष्यवाणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली आहे. माध्यमांशी बोलतांना खैरे म्हणाले, शिरसाट यांना त्यांच्या कामात खूप सुधारणा करण्याची गरज आहे. ते काहीही बडबड करतात, बोलतात ज्याला भाजपही कंटाळले आहे, असा दावा देखील खैरे यांनी केला.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Chandrakant Khaire On Sattar News : वाढत्या शेतकरी आत्महत्या, पीकांचे नुकसान हाच कृषीमंत्र्यांचा पायगुण ?

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयाने सोडवला. त्यामुळे आता राज्य सरकार मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करणार ? झाला तर त्यात कोणाची वर्णी लागणार याच्या चर्चा सुरू झाल्या. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रीपद मिळणार का? याच्या देखील चर्चा नव्याने सुरू झाल्या आहेत. या संदर्भात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मात्र वेगळीच भविष्यवाणी केली आहे.

खैरे म्हणाले, एकतर राज्य सरकार सध्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणारच नाही. (Shivsena) कारण मिंधे सरकारने नेमलेल्या प्रतोदाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोर गेला आहे. त्यामुळे त्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. राहिला प्रश्न संजय शिरसाट यांचा तर त्यांना भाजपच मंत्रीपद मिळू देणार नाही.

शिरसाट कितीही सांगत असले की त्यांनी स्वतःमध्ये बदल केले आहेत, तरी देखील त्यात तथ्य नाही. ते अजूनही नको ती बडबड करतात, काहीही बोलतात. त्यांनी जर हे टाळले असते तर आधाची मंत्री झाले असते. त्यामुळे सध्या तरी शिरसाट यांच्या मंत्री होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचा पुनरुच्चार खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com