Chandrakant Khaire News : ठाकरे गटाच्या नेत्यांचे दौरे सुरू, खैरे विदर्भात करणार शिवगर्जना..

Sambhajinagar :चिन्ह आणि नाव गमावल्यानंतर निष्ठावंताचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला होता.
Shivsena Leader Chandrakant Khaire News Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire News AurangabadSarkarnama

Marathwada : नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान, राज्याच्या विविध भागात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे.

Shivsena Leader Chandrakant Khaire News Aurangabad
Imtiaz Jalil News : नामांतराचा सरकारी निर्णय मान्य नाही, मी औरंगाबादेत जन्मलो, तिथेच मरणार..

त्यानूसार मराठवाड्यातील नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Shivsena) खैरे आजपासूनच विदर्भाच्या दौऱ्यावर असून शिवगर्जनेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात खैरे हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

चिन्ह आणि नाव गमावल्यानंतर निष्ठावंताचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन खैरे यांनी केले होते. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर विदर्भातील पाच जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. आजपासून शिवगर्जना अभियानाला सुरूवात झाली असून दुपारी १ वाजता कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे शिवसैनकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन, त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे शिवसेना पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतील.

सोमवार २७ रोजी दुपारी १२:३० वाजता चामुर्शी येथे शिवसैनिक मेळावा व मार्गदर्शन, चामुर्शीहुन चंद्रपरकडे रवाना, सायंकाळी एसटी वर्कशॉप चंद्रपूर येथे शिवसैनिक मेळाव्यास मार्गदर्शन करतील. मंगळवार, २८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सकाळी ११:३० वाजता राजुरा येथे शिवसैनिक मेळाव्यात मार्गदर्शन, त्यानंतर ४ वाजता भद्रावती, वरोरा येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतील.

बुधवार, १ मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सकाळी ११ वाजता शिवसेना पदाधिकारी मेळाव्यास मार्गदर्शन, वणीवरून यवतमाळकडे प्रयाण. ४ वाजता यवतमाळ येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतील. गुरुवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजता दारव्हा,जिल्हा यवतमाळ येथे शिवसैनिक पदाधिकारी मेळावा व मार्गदर्शन, दारव्हाहुन उमरेड कडे प्रयाण, ४ वाजता उमरेड येथे मेळावा व मार्गदर्शन, सायंकाळी ७:३० वाजता वाशिम येथे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक.

Shivsena Leader Chandrakant Khaire News Aurangabad
Ashok Chavan News : न्यायमुर्ती स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, लोकांनी न्याय मागायला कुठे जायचे?

शुक्रवार, ३ मार्च रोजी वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे सकाळी ११ वाजता मेळावा व मार्गदर्शन, त्यानंतर दुपारी २ वाजता वाशीम येथे मेळाव्यास मार्गदर्शन, वाशीमवरून रिसोडकडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता शिवसेना पदाधिकारी मेळाव्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे मुख्य मार्गदर्शन करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com