Chandrakant Khaire News : शेतकरी संकटात, पण खासदार राजकारणात दंग ; लोकांना माझ्याकडून अपेक्षा..

Shivsena : शहराचे नामांतर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी या विरोधात साखळी उपोषण सुरू केले.
Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News
Imtiaz Jalil-Chandrakant Khaire NewsSarkarnama

Marathwada : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे खासदार यांच्यावर निशाणा साधला आहे. खैरे यांनी गंगापूर, वैजापूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी देखील संवाद घडवून आणला. या पाहणी दौऱ्यानंतर खैरेंनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली.

Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News
Ambadas Danve News : पीकांचे नुकसान पाहण्यासाठी दानवे मोटारसायकलवर शेतात..

शेतकरी संकटात आहे, त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला, त्याला तातडीने मदतीची गरज आहे. असे असतांना त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे खासदार (Imtiaz Jalil) नामांतरावरून राजकारण करण्यात दंग आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडून कसल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोक आता माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहेत, त्यांना मी त्यांच्यासाठी काम करेन असा विश्वास असल्याचे खैरे (Chandrakant Khaire) यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी या विरोधात साखळी उपोषण सुरू केले. गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. इम्तियाज हे न चुकता दररोज आंदोलनस्थळाला भेट जावून सहभागी आंदोलकांचे मनोबल वाढवत आहे. नुकताच कॅन्डल मार्च काढत त्यांनी आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.

तर दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. तसेच सरकारकडून तातडीने मदत मिळवून देण्याचा शब्द थेट उद्धव ठाकरे यांच्याकडूनच शेतकऱ्यांना मिळवून दिला. उध्दव ठाकरे यांनी थेट फोनवर फकिरा मोरे या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची माहित घेत त्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत दिलासा दिला.

खैरे यांनी गंगापूर, वैजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन व्यथा जाणून घेतल्या. गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा, अगरवडगाव, गणेशपूर, गळनिंब, कायगाव आदी भागात पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. एकीकडे सरकार आपले लोक आणि सरकार वाचविण्यासाठी व्यस्थ आहे. मात्र अन्नदाता बळिराजा शेतकरी अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. गहू, कांदा, फळबागा, भाजीपाला आदी पिंकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in