Chandrakant Khaire News : परिवर्तन अटळ, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता..

Latur : लातूर जिल्ह्यातून सुद्धा लोकसभेचा खासदार तसेच सहाच्या सहा आमदार महाविकास आघाडीचेच.
Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray News
Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray NewsSarkarnama

Marathwada : छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा, असे आवाहन ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची संयुक्त सभा छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे. या सभेसाठी चंद्रकांत खैरे हे मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

Chnadrakant Khaire-Uddhav Thackeray News
Mla Sachin Ahir News : वरळी मतदारसंघातून आमदार व्हा, मंत्री व्हा, विरोधकांच्या अहिरांना शुभेच्छा..

बीड, लातूर, धाराशीवर जिल्ह्यातील बैठकातून महाविकास आघाडीच्या सभेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खैरे (Chandrakant Khaire) करत आहेत. लातूर येथील बैठकीत बोलतांना खैरे म्हणाले, देशात सध्या एक प्रकारची अघोषित आणीबाणी असून लोकशाही संकटात आहे. (Latur) सत्तेचा गैरवापर करून प्रादेशिक पक्ष संपवण्याचा आणि विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे.

या अन्यायाच्या विरोधात तसेच राज्यघटना, लोकशाही वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सभा मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई या सर्व ठिकाणी होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मराठवाड्यातील जाहीर सभेचे यजमान पद शिवसेनेकडे असल्यामुळे मी आढावा बैठका घेत आहे.

भविष्यात महाविकास आघाडी एकसंघपणे राहण्यासाठी लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापासून ते गावापर्यंत बैठका घेऊन समन्वय साधावा, असे आवाहन खैरे यांनी केले. महाराष्ट्रात निश्चित सत्ता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी अहोरात्र झटत असून लातूर जिल्ह्यातून सुद्धा लोकसभेचा खासदार तसेच सहाच्या सहा आमदार महाविकास आघाडीचेच येतील, असा विश्वास खैरेंनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com