Chandrakant Khaire : नारायण राणे थर्ड क्लास माणूस..

राणे आणि त्यांची मुलं शिवसेनेवर नेहमीच तोंडसुख घेत असतात. पण त्यांनी आपला पुर्व इतिहास काय होता? हे पाहिले पाहिजे. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Narayan Rane News, Aurangabad
Chandrakant Khaire-Narayan Rane News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : नारायण राणे हा थर्ड क्लास माणूस आहे, ज्या भाषेत त्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, ते पाहता ते शुद्धीत बोलत होते का? हे तपासले पाहिजे, असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी लगावला. काल मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेले तडाखेबाज भाषण अनेकांना झोंबले. त्यानंतर गद्दार आणि विरोधकांना चांगलाच पोटशुळ उठला आहे. (Narayan Rane) नारायण राणे हे त्यापैकीच एक असल्याची टीका देखील खैरे यांनी केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल केलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक मुद्यावर टीका करण्यासाठी जाहीर पत्रकार परिषदच घेतली. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक विधानाचे खंडण करत प्रहार केला.

राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा उल्लेख केला, डोळे काढण्याची धमकी दिली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राणे हे थर्ड क्लास असल्याचे म्हणत तोफ डागली. खैरे म्हणाले, नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका करत असतात. अशा थर्ड क्लास माणसाला आम्ही कवडीची किंमत देत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे अकलेचे तारे तोडले आहेत, ते पाहिल्यानंतर पुन्हा एकदा हा माणूस किती थर्ड क्लास आहे हे सिद्ध झाले आहे. पत्रकार परिषदेत त्याने वापरलेली भाषा पाहता ते शुध्दीत होते की, मग दारू पिऊन आले होते, हे तपासावे लागले.

Chandrakant Khaire-Narayan Rane News, Aurangabad
Aurangabad : राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..

राणे आणि त्यांची मुलं शिवसेनेवर नेहमीच तोंडसुख घेत असतात. पण त्यांनी आपला पुर्व इतिहास काय होता? हे पाहिले पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राणे यांची ओळख आहे, हे त्यांनी विसरू नये. राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेली भाषा, दिलेली धमकी याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार करणार आहोत, असेही खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in