Ashok Chavan News : माझ्याबाबतीत घातपाताची शक्यता, मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचाही गैरवापर..

Marathwada : ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
Ashok Chavan News, Aurangabad
Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

Marathwada : माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून फसवणूकीचा प्रकार समोर आला असतांना आता अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांच्या लेटरहेडमधील मजकूर बदलणे, बनावट लेटरहेड बनवण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Ashok Chavan News, Aurangabad
Aurangabad News : पक्षाचे नाव, चिन्ह गमावल्यानंतर होतोय निष्ठावंतांचा पहिला मेळावा..

अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहेत. (Nanded) या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते. (Marathwada)

त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने मी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.

ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले, त्याअर्थी पुढील काळात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा माझा संशय आहे.

बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे.

Ashok Chavan News, Aurangabad
Sanjay Shirsat News : जे जे शिवसेनेचे ते आता आमचे ; शिवसेना भवनावर दावा..

सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने कायदेशीर दृष्ट्या योग्य कार्यवाही करावी, अशीही माझी मागणी असल्याचे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com