चाकूर: नगराध्यक्षपदी प्रहारचे माकणे;भाजपच्या मदतीने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम

आज झालेल्या निवडणुकीत चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रहारचे कपील माकणे विजयी झाले. तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे अरविंद बिराजदार यांची निवड करण्यात आली. ( Minister Bacchu Kadu)
चाकूर: नगराध्यक्षपदी प्रहारचे माकणे;भाजपच्या मदतीने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम
Makne-Birajdar, ChakurSarkarnama

चाकूर : नगरपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारने मराठवाड्यात एन्ट्री केली. लातूर (Latur) जिल्ह्यातील चौकूर नगरपंचायतीत यशही मिळवले. आता भाजपच्या (Bjp) मदतीने महाविकास आघडीचा करेक्ट कार्यक्रम करत नगराध्यक्षपदही पटकावले.

आज झालेल्या निवडणुकीत चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रहारचे कपील माकणे विजयी झाले. (Ncp) तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे अरविंद बिराजदार यांची निवड करण्यात आली. नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सहा, महाविकास आघाडीचे आठ व भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले. (Marathwada)

आज अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडी प्रक्रिया पार पडली. प्रहारच्या कपील माकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करीम गुळवे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.

Makne-Birajdar, Chakur
जामीन मिळाला पण राणेंना कणकवलीपासून लांबच राहावे लागणार

गुळवे यांना आठ व प्रहार जनशक्ती पक्षाचे कपील माकणे यांना नऊ मते पडली. तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भागवत फुले यांना आठ व भाजपचे अरविंद बिराजदार यांना नऊ मते पडली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने मराठवाडयात पहिल्या नगरपंचायतीमध्ये भाजपच्या सहकार्यातून पक्षाचा झेंडा फडकावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in