Marathwada : शिंदेंच्या सभेसाठी खुर्च्या लागल्या, गर्दीसाठी सत्तारांचा मतदारसंघात दौरा..

एकाच दिवशी, एकाच वेळी हे राज्यातील दोन तरुण नेते सिल्लोडमध्ये दाखल होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Abdul Sattar)
Shrikant Shinde Rally in Sillod News, Aurangabad
Shrikant Shinde Rally in Sillod News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उद्या ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी हजारो खुर्च्या नगर परिषदेच्या मैदानावर लावण्यात आल्या आहेत. आता सभेला प्रचंड गर्दी जमावी यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मतदारसंघात फिरून नागरिकांना सभेला येण्याचे आवाहन केले आहे. सायंकाळी होणारी श्रीकांत शिंदे यांची सभा आणि त्यात ते काय बोलतात? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Shrikant Shinde Rally in Sillod News, Aurangabad
Nana Patole : `भारत जोडो` यात्रा म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढाच..

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा देखील सिल्लोडमध्ये उद्याच शिवसंवाद दौरा आहे. लिहाखेडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी आणि संवाद साधत ठाकरे सिल्लोडच्या आंबेडकर चौकात हजेरी लावून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. (Abdul Sattar) एकाच दिवशी, एकाच वेळी हे राज्यातील दोन तरुण नेते सिल्लोडमध्ये दाखल होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Aditya Thackeray) आदित्य ठाकरेंची सभा होणार होती की नाही? हा वाद आता मागे पडला असून ठाकरेंकडून या दौऱ्यात राजकीय भाषण होणार नाही, असे बोलले जाते.

तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे हे मात्र ठाकरे यांनी सभा रद्द करत संवाद साधण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरून टीका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार व आदित्य ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय कलगितुरा रंगलेला आहे. मतदारसंघात येवून शिवसंवाद यात्रा, सभा घेवून दाखवण्याचे आव्हान सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते. ते त्यांनी स्वीकारले देखील.

पण त्यानंतर सत्तारांनी श्रीकांत शिंदे यांची सभा ठेवत शिवसेनेची कोंडी केली. यावर वाद न वाढवता ठाकरेंनी एक पाऊल मागे घेत सभेऐवजी संवाद साधत दौरा करण्याचे ठरवले. याला ठाकेंची माघार, ते रणछोडदास आहेत, असे हिणवत सत्तार समर्थकांकडून शिंदेच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली.

अब्दुल सत्तार यांनी स्वतः सभा स्थळाची पाहणी करत सूचना दिल्या. आज सायंकाळी सभेसाठी व्यासपीठ आणि खुर्च्या लावत तयारी पुर्ण करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदे यांचे देखील मुख्यमंत्र्यांप्रमाणेच शहरात जंगी स्वागताची तयारी सत्तारांकडून करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in