MLA Subhash Desai On Mumbai : मुंबई गिळण्याची केंद्राची `निती`, सुभाष देसाईंचा आरोप..

Mumbai Political News : तमाम शिवसैनिक संयुक्त महाराष्ट्रासारखा उग्र संग्राम लढायला सज्ज आहेत.
MLA Subhash Desai On Mumbai News
MLA Subhash Desai On Mumbai NewsSarkarnama

Maharashtra Political News : केंद्रातील मोदी सरकारचा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर डोळा आहे. (MLA Subhas Desai News) मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मोदी-शहांचा प्रयत्न आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून कायम केला जातो. मुंबईत सध्या सुरू असलेल्या भाजप विरोधी इंडिया गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

MLA Subhash Desai On Mumbai News
Imtiaz Jaleel Letter To CM: नुसत्या बैठका घेऊन विकास होणार नाही, शाळा खोल्यांसाठी पाचशे कोटी द्या..

माजी उद्योगमंत्री शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी निती आयोगाने केलेल्या आर्थिक विकास आराखड्याचा दाखला देत पुन्हा याविषायकडे लक्ष वेधले. देसाई यांनी या संदर्भात ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारच्या निती आयोगाने म्हणे मुंबईच्या आर्थिक विकासाचा आराखडा बनवला असून त्याची अंमलबजावणी आता केंद्र सरकार करणार.

हे दुसरेतिसरे काही नसून मुंबई वेगळी करून गिळण्याचा हा डाव न ओळखण्याइतका महाराष्ट्र बावळट वाटला काय ? (Mumbai) अशा भयंकर कारस्थानाला विरोध नको म्हणूनच उद्धव साहेबांचे सरकार गद्दारी घडवून पाडले आणि आपल्या ताटाखालचे मांजर बनून राहील असे अक्षरश: 'मिंधे' सरकार बनवले.

दुर्दैव हेच की विधानसभेत यावर चर्चा झालीच तर भाजपा- मिंधे गट-दादा गट मिळून जवळजवळ दोनशे आमदार खाली मान घालून आणि मूग गिळून बसतील. पण सभागृहाबाहेरचा शिवरायांचा महाराष्ट्र आकाशपाताळ एक केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तमाम शिवसैनिक संयुक्त महाराष्ट्रासारखा उग्र संग्राम लढायला सज्ज आहेत, असा इशाराही देसाई यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in